‘…म्हणून मोठा झाल्यानंतर तैमुर करू शकतो सिनेमात काम’, वडील सैफ अली खाननं सांगितलं कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सैफ अली खाान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा लाडका तैमुर अली खान (Taimur Ali Khan) आपल्या क्युटनेसमुळं नेहमीच चर्चेत येत असतो. त्याचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ नेहमीच सोशलवर व्हायरल होत असतो. तैमुरचे फोटो आणि व्हिडिओ समोर यायचा उशीर असतो की, क्षणांतच ते व्हायरल होताना दिसत असतात. पुन्हा एकदा तैमुर चर्चेत आला आहे. सैफ आणि करीनानं अनेकदा तैमुरच्या फ्यूचरवरही भाष्य केलं आहे. सैफचं असं म्हणणं आहे की, मोठा झाल्यानंतर तैमुर फॅमिलीतील इतर लोकांप्रमाणे सिनेमात अ‍ॅक्टिंग करताना दिसू शकतो.

एका मुलाखतीत सैफनं तैमुरच्या फ्यूचरवर भाष्य केलं आहे. सैफ म्हणाला की, माझी बहीण सिनेमात काम करते. माझी वाईफ आणि एक्स वाईफसुद्धा. जवळपास सर्वच लोक. माझी मुलगी अ‍ॅक्ट्रेस आहे. माझ्या मुलालाही अ‍ॅक्टर व्हायचं आहे. मला असं वाटतं की, मोठा झाल्यानंतर तैमुरही अ‍ॅक्टर होऊ शकतो. आताच तो आम्हाला खूप एंटरटेन करताना दिसत असतो.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो बंटी और बबली आणि भूत पोलीस सिनेमात काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तो तान्हाजी सिनेमानंतर जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. याशिवाय त्यानं कलाकांडी, शेफ, लाल कप्तान अशा काही सिनेमातही काम केलं आहे.

 

You might also like