प्रभु श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर सैफ अली खाननं मागितली माफी, म्हणाला – ‘ते आमचे हिरो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आजकाल आपल्या नवीन चित्रपटाविषयी वादात सापडताना दिसत आहे. वास्तविक, त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाविषयी विरोधकांचा आक्षेप असा आहे की या चित्रपटाने रावणाची चांगली बाजू दाखविली असून रामची प्रतिमा अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जेव्हा भाजप नेते राम कदम यांना हे कळले तेव्हा चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावणारे असे कोणतेही दृश्य नसावेत असे त्यांचे म्हणणे आहेे. त्याचवेळी राम कदम यांनी असा इशाराही दिला की ते हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाहीत. या क्षणी अभिनेता सैफ अली खानची प्रतिक्रिया आली आहे.

वादग्रस्त वक्तव्याबद्दल सैफने व्यक्त केली दिलगिरी
सैफ अली खानने एका निवेदनात म्हटले की, मला हे कळले आहे की माझ्या एका मुलाखतीच्या वेळी जे बोलले होते त्यामुळे लोक दुखावले गेले आहेत. हे करण्याचा माझा हेतू नव्हता आणि मला हे कोणत्याही प्रकारे नको आहे. मी माझे विधान मागे घेत आहे आणि जेे माझ्या शब्दांनी दुखवले आहे त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यासाठी भगवान राम नेहमीच हिरोची प्रतिमा असतात. अदीपुरुष हा वाईटावर विजय मिळवण्याचा उत्सव आहे. आमची संपूर्ण टीम ही उत्कृष्ट कथा पडद्यावर आणण्यासाठी काम करीत आहे.

दरम्यान यापूर्वी राम कदम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आजकाल हिंदू भावना दुखावणाऱ्या चित्रपटांमध्ये कथा किंवा सीन दाखवणे हा इंडस्ट्रीचा ट्रेंड बनला आहे. हे जाणिवपूर्वक केले जात आहे असे आम्हाला वाटते. इतर धर्मांसोबत असे का केले जात नाही? एक हिंदू म्हणून मी म्हणत आहे की आम्ही त्यांना कोणत्याही किंमतीत धार्मिक भावना दुखावू देणार नाही. तानाजीच्या वेळीही तेच दिसून आले. परंतु यावेळी असे काही होणार नाही.

2022 मध्ये रिलीज होईल आदिपुरुष
आदिपुरुष चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट बाहुबली फेम साऊथ सुपरस्टार प्रभासचा पुढचा चित्रपट आहे. या चित्रपटात सैफ अली खान लंकेशची भूमिका साकारणार आहे. प्रभास रामच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिपुरुष 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होईल.