जेव्हा सैफी अली खान म्हणाला – ‘मीही नेपोटीजमला बळी पडलोय’ ! लोकांनी केलं प्रचंड ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. बॉलिवूडमधील पॉलिटीक्स आणि गटबाजीवरूनही बोललं जात आहे. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. आता पर्यंत अनेक कलाकारांनी नेपोटीजम आणि गटबाजीवरील त्यांचं मत मांडलं आहे. आता बॉलिवूड स्टार सैफ अली खान यानंही नेपोटीजमचा शिकार झाल्याचा खुलासा करत आपला अनुभव शेअर केला आहे. यानंतर सैफ प्रचंड ट्रोल होताना दिसला.

एका मुलाखतीत बोलताना सैफ म्हणाला, “नेपोटीजम असा प्रकार आहे ज्याला मीही बळी पडलो आहे. मी कोणाचं नाव नाही घेत परंतु एकदा एकाच्या वडिलांनी फोन करून म्हटलं होतं की, सिनेमात आमुक आमुकला घेऊन नका. त्याला घ्या. हे सगळं माझ्यासोबतही झालं आहे.”

सैफचं हे सांगणं लोकांना काही पटलं नाही. त्यांनी प्रसिद्ध अदाकारा शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटर मंसूर अली खान पतौडीच्या मुलाला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली.

सैफच्या वक्तव्याला धरून सोशलवर अनेक प्रकारचे ट्विट्स आणि मीम्स व्हायरल होत आहेत. एकानं म्हटलं की, अभिनंदन सैफ, तुम्ही आताच अनन्य पांडे इंस्टिट्युटमधून स्ट्रगलमध्ये डिग्री प्राप्त केली आहे.

आणखी एकानं लिहलं की, मला वाटत की, ह्यांना अजून नेपोटीजमचा नीट अर्थ समजलेला नाही. कोणीतरी त्यांना याचा अर्थ सांगा.