लाल कप्तान ! सैफ अली खानच्या डोळ्याला दुखापत, अंगावर शहारा आणणारा ‘लुक’

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – लाल कप्तान या सिनेमात अभिनेता सैफ अली खान सध्या जबरदस्त भूमिका साकारताना दिसत आहे. या सिनेमातील सैफचा लुक सर्वांनाच आवडला आहे. अद्याप या सिनेमाचे 3 ट्रेलर रिलीज झाले. तीनही ट्रेलर प्रेक्षकांना आवडले आहेत. सैफच्या लुकची खूप चर्चा होताना दिसत आहे. परंतु नागा साधूच्या गेटअपसाठी सैफला खूपच कष्ट घ्यावे लागले आहेत.

https://www.instagram.com/p/B3Uw2-OHpYS/?utm_source=ig_embed

सोमवारी सैफचा आणखी फोटो समोर आला ज्यात त्याचा खतरनाक लुक दिसत होता. सैफच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणाही दिसत होत्या. हे फोटो त्याच्या अ‍ॅक्शन सीनसाठी तयार होतानाचे आहेत. सिनेमात त्याचे अनेक फाईटींग सीन आहेत. यातील सैफचे अनेक खतरनाक लुक समोर येत आहेत. असाच एक लुक सध्या समोर आला आहे.

सैफचा लढाईनंतरचा हा लुक आहे. या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सैफच्या मेकअपचंही कौतुक होताना दिसत आहे. याआधी या सिनेमातील पोस्टर रिलीज झालं होतं. हे पोसटरही खूप व्हायरल झालं होतं. 18 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. आधी हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होता परंतु नंतर ही डेट बदलण्यात आली.

Visit : Policenama.com