सैफ अली खानने शेअर केले ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘सिक्रेट्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी सिनेमातील यश चोपडाच्या प्रत्येक शोधाने कमाल केली आहे. यश चोपडाने सैफ अली खानला लाँच केले परंतु सैफने आपल्या स्वत:च्या दमावर नाव कमावलं आहे. सैफ जीवनाच्या प्रत्येक पावलावर रिस्क घेत असतो. त्याच्या करिअरमधील सर्वात मोठी रिस्क होती त्याची वेब सीरीज सेक्रेड गेम्स. याचा दुसरा सीजन पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. याबद्दल एका मुलाखतीत सैफने अनेक सिक्रेट शेअर केले आहेत.

जेव्हा कोणी मोठा कलाकार डिजिटलमध्ये येण्याचा विचारही करत नव्हता तेव्हा तू नेटफ्लिक्सचा हात धरला. सारखंच रिस्क घ्यायला भीती नाही वाटत का ?

सैफ म्हणाला की, “मी स्वत:च्या निर्णयांवर विश्वास ठेवतो. जेव्हा पहिल्यांदा नेटफ्लिक्सचं नाव ऐकलं तेव्हाच वाटलं की, हे काहीतरी मोठं असणार. मी नेटफ्लिक्सवर अनेक शोज पाहिले आहेत. काही मला खूप आवडतात. हे टीव्ही सारखं नाहीये. मी असं नाही म्हणत आहे की, टीव्ही माध्यम वाईट आहे. त्यावर काम करण्याला काही वेळच नाही. कितीही लांब होत जातं. टीव्ही निर्माता कलाकारांना पिळून काढतात. हे खूपच वेगळं माध्यम आहे. मला असं वाटलं होतं की, मीही या माध्यमावर निर्माता बनू शकता. मी नेटफ्लिक्सवर कॉप ड्रामा सीरीज बनवायचा विचार कर होतो. तेव्हाच हा शो आला आणि मला हो म्हणण्यासाठी 2 सेकेंड्सही नाही लागले.

सेक्रेड गेम्सची चर्चा होताना फक्त गणेश गायतोंडेचा विषय होता. यावेळी सरताज सिंगवर किती फोकस असणार आहे ?

सैफ म्हणतो की, “हा सीजन थोडा बदललेला आहे. सरताजही पहिल्यापेक्षा फिट आणि गतीशील आहे. यात ज्यादा अॅक्शन पाहायला मिळणार आहे. सरताच्या पत्नीसोबत झालेल्या विवादांवरही फोकस केला जाईल. याशिवाय बापाचीही थोडी स्टोरी असेल.

लंगडा त्यागी, दीपक कुमार आणि बोरिस नंतर आता सरताज. कोणत्या भूमिकेसाठी काय तयारी केली आणि परिणाम पाहून आता कसं वाटत आहे?

सैफ म्हणतो की, “खरं सांगायचं झालं तर, डोक्यावर पगडी बांधणं हे दिसायला आणि मनालाही खूप चांगलं वाटतं. तो खूप सच्चा माणूस आहे. ती भूमिका साकारताना मजा येते. खूपच मनोरंजक भूमिका आहे. सरदार बनणं हे माझ्या आवडत्या भूमिकांपैकी एक आहे. लव आजकल मध्ये सरदार बनलो होतो तेव्हाही छान वाटलं होतं.

आरोग्यविषयक वृत्त

पिळदार शरीरयष्‍टी घडवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

वजन कमी करण्‍याचा ‘गोड’ उपाय ! एकदा करून बघाच

गरोदर असताना महिलांनी अशी घ्यावी स्वत:ची काळजी

दृष्टी वाढवण्यास फायदेशीर ठरु शकतात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या कोणत्या*

वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ‘या’ १३ खास टीप्स