800 कोटींचा आहे ‘पतौडी पॅलेस’, सैफ अली खाननं आपल्या कमाईनं पुन्हा खरेदी केला ‘महाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंसूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा मुलगा अभिनेता सैफ अली खान यानं सांगितलं होतं की, “वडिलांच्या निधनानंतर आपल्या पूर्वजांचा महाल परत मिळवण्यासाठी त्याला तो हॉटेल चेनला भाड्यानं द्यावा लागला होता. एका मुलाखतीत बोलताना सैफनं याबाबत सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B8szxjSpDA6/?utm_source=ig_embed

मुलाखतीत बोलताना सैफ अली खान म्हणाला, “जेव्हा माझे वडिल(मंसूर अली खान पतौडी) याचं निधन झालं तेव्हा हा महाल नीमराणा हॉटेल्सला भाड्यानं द्यावा लागला होता. याआधीच अमन(नाथ) आणि फ्रान्सिस (वाक्झिरग) हा महाल चालवत होते. फ्रान्सिसच्या निधनानंतर मला विचारण्यात आलं की, तुम्हाला हा महाल परत हवा असेल तर तो पुन्हा घेऊ शकता. मी म्हणालो की, होय मला हवा आहे. तेव्हा ते म्हणाले की, यासाठी खूप सारे पैसे द्यावे लागतील.”

सैफ अली खान पुढे म्हणाला, “जे घर मला वारसाहक्कात मिळायला हवं होतं त्यासाठी मला सिनेमातून कमावलेले पैसे द्यावे लागले होते. तुम्ही भूतकाळापासून दूर राहू शकत नाहीत. कमीत कमी आपण आपल्या कुटुंबापासून दूर राहू शकत नाही. कारण याशिवाय दुसरं काहीच नाही.”

पतौडी पॅलेसबद्दल सांगताना सैफ म्हणाला, “81 वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली होती. हा पॅलेस 1935 मध्ये आठवे नवाब आणि माजी दिग्गज क्रिकेटर इफ्तिखार अली खान पतौडी अली हुसैन सिद्दीकी यांनी बनवला होता.” असं सांगितलं जात आहे की, या महालाची किंमत 800 कोटी आहे. यात 150 हून खोल्या आणि 100 हून अधिक लोक इथे काम करतात. इफ्तिखार यांचा मुलगा आणि सैफचे वडिल मंसूर अली खान पतौडी यांना एका आंतरराष्ट्रीय वास्तुविशारदानं नुतनीकरण केलेला महाल मिळाला होता.

या महालात अनेक मैदान, गॅरेज आहेत. नुतनीकरण केल्यानंतर सैफनं या महालाच एक फोटो शेअर केला आहे. एका मोठ्या ड्रॉईंग रूमव्यतिरीक्त महालात 7 बेडरूम, ड्रेसिंग आणि बिलियर्ड रूम आहेत.