सैफ आणि करीनाच्या वयाचा अजयने केला उल्लेख, सैफ ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अजय देवगणचा आगामी सिनेमा दे दे प्यार दे या सिनेमाचा नुकताचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तब्बू, रकुल प्रती आणि अजय देवगण यांच्यात मजेदार केमिस्ट्री दिसत आहे. यात सुरुवातीलाच अजय आणि जावेद जाफरीचं बोलणं सुरु असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

यात जावेद जाफरी अशा कपलचं उदाहरण देत आहे ज्यांच्या वयात खूप अंतर आहे. शिवाय अजय देवगण यावेळी करीना कपूर आणि सैफ अली खान यांचं उदाहरणंही देतो. यावर आता सैफ अली खानने दिलेली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर खुद्द अजय देवगणने सैफला सिनेमातील या डायलॉग बद्दल सांगितले होते.

अजय या डायलॉगवर सैफ अली खानने शानदार प्रतिक्रिया दिली आहे. सैफ म्हणाला की, “हे दॅट्स कूल मॅन.” सैफच्या या प्रतिक्रियेवरून लक्षात येते की, तो करीना सोबत किती कम्फर्टेबल आहे. शिवाय मुव्हीतील दिलेले त्याचे उदाहरणावरही सैफचा काही आक्षेप नसल्याचं दिसत आहे. अजय आणि सैफ हे चांगले मित्र आहेत. पुन्हा एकदा ते दोघे एकत्र काम करतानाही दिसणार आहे. अजयच्या ‘तानाजी- अनसिंग हिरो’ या सिनेमात दोघे एकत्र दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा अशी आहे की एक कपल आहे जे खूप पूर्वीच वेगळं झालं आहे. अजय देवगण आणि तब्बू हे कपलच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना दोन मुलेही असतात. यात रकुल प्रितही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच याचा ट्रेलरदेखली रिलीज झाला आहे.

अजय देवगण 50 वर्षांचा असून तो 26 वर्षाच्या रकुल प्रितला डेट करू इच्छित आहे. परंतु अजयची मुलंच तिच्या वयाची आहेत. शिवाय अशातच तिथे अजयच्या जीवनात तब्बू पुन्हा एन्ट्री घेते. दोन वेगळ्या वयाच्या स्त्रियांमध्ये अजय अडकला आहे. या भोवतीच सिनेमाची कथा फिरते आहे. मजेदार कॉमेडी ट्रेलरमध्ये दिसत आहे. यावरून चित्रपट कॉमेडी असणार याचा अंदाजही येतो.

Loading...
You might also like