सैफ अली खाननं सांगितलं बेडरूम ‘सिक्रेट’, करीनालाजली अन्…

मुंबई : पोलीसनामाम ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सैफ अली खान नुकताच करीना कपूर खानच्या व्हॉट वुमेन वॉन्ट 2 या चॅट शोमध्ये गेस्ट म्हणून आला होता. यावेळी त्यानं त्याची फवरेट जोडी कोण आहे हे सांगितलं. याशिवाय त्यानं काही बेडरूम सिक्रेटही सांगितले जे ऐकून करीना लाजेनं लाल झाली.

करीनानं जेव्हा सैफला त्याच्या फेवरेट जोडीविषयी विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की, त्याला विराट आणि अनुष्काची जोडी खूप आवडते. एका सेलिब्रिटी जोडीसाठी हे खूप अवघड असतं की, एवढं मोठं झाल्यानंतरही ते एकमेकांसोबत रहावं. माझ्या आईवडिलांप्रमाणेच विराट आणि अनुष्काला हे मॅनेज करायला जमलं आहे. यावर करीना म्हणाली की, तू आपलं नाव का नाही घेतलंस यावर चिमटा काढत सैफ म्हणाला, “आपणंच आपलं कौतुक करणं चागलं नाही. खरं सांगायचं तर नजर लागायला नको म्हणून आपलं नाव नाही घेतलं.”

तुम्हाला माहिती आहे का सैफ आणि करीनाची लव स्टोरी पुढे नेण्याचं काम एका बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं आहे. कारण करीनाला डेट करताना सैफ खूप घाबरलेला होता. कारण त्यानं याआधी कधीच वर्किंग लेडीला डेट केलं नव्हतं. त्यामुले करीनाला डेट करणं त्याला अवघड वाटत होतं. परंतु अभिनेत्री राणी मुखर्जीनं त्यांच्या दोघांत क्युपिडचं काम केलं. राणीनंच या दोघांची लव स्टोरी पुढे नेली. सैफनं याबाबत खुलासा केला आहे.

यानंतर सैफनं बेडरूम सिक्रेटबद्दल असं काही वक्तव्य केलं की करीना पाणी पाणी झाली. करीनानं जेव्हा विचारलं की, लग्नानंतर वैवाहिक जीवनात करायला हवी अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे त्यांच्यात जोश कायम ठेवेल. क्षणाचाही विलंब न लावता सैफनं उत्तर दिलं की, रोल प्ले. नंतर त्यानं सांगितलं की, तो गंमत करत होता.

सैफ म्हणाला, “जर तुम्ही आयुष्यात काही वेगळं करत राहिलात तर एक टवटवीतपणा राहतो. जेव्हा दिवसाच्या शेवटी तुम्ही भेटता तेव्हा काही तरी नवीन तुमच्याकडे असतं. रोजच एकसारख्या गोष्टी केल्यानं वैवाहिक जीवन बोर वाटू लागतं. वैवाहिक जीवनात स्पार्क कायम ठेवण्यासाठी जास्त प्रेशर नाही द्यायला पाहिजे.”

You might also like