#MeToo : ‘हा’ खानही शोषणाचा शिकार

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन  – # मी टू ची सध्या जोरदार चर्चा आहे. यात आता अभिनेता सैफ अली खानने देखील आपला अनुभव शेअर केला आहे. करिअरच्या सुरुवातीला मलाही त्रास दिला गेला होता, तो लैंगिक छळ नसला तरी 25 वर्षांपूर्वी झालेल्या जाचामुळे मी अजूनही संतप्त आहे, असं प्रख्यात अभिनेता सैफ अली खानने सांगितलं. इतरांच्या वेदना लोकांना समजतच नसल्याची खंत सैफने व्यक्त केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f779cf2-d049-11e8-b14b-3552a527ac58′]
‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने आपला #MeToo अनुभव शेअर केला. ‘मला त्याविषयी फार काही बोलायचं नाही, कारण आजही मी तितका महत्त्वाचा नाही. माझ्यासोबत काय झालं होतं, ते आठवलं तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या जे सुरु आहे, ते चांगलं आहे. लोकांना न्याय हवा आहे. बदल घडतोय, ही सकारात्मक बाब आहे’ असंही सैफ म्हणाला.
1991 मध्ये दिग्दर्शक राहुल रवैल यांनी सैफला बेखुदी (1992) चित्रपटासाठी साईन केलं होतं. चित्रीकरणाचं पहिलं शेड्यूल झाल्यानंतर सैफ ‘अनप्रोफेशनल’ वागत असल्याचं सांगत त्याला रवैल यांनी काढलं. सिनेमात नवोदित काजोलच्या जोडीला कमल सदानाची वर्णी लागली.
1993 मध्ये यश चोप्रा यांच्या ‘परंपरा’ चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बेखुदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सैफची भेट अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाली. दोघं ऑक्टोबर 1991 मध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
 [amazon_link asins=’B06Y5HD2T7,B07DFPG3NH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33529ee8-d04a-11e8-9158-81d53a5936b1′]
साजिद खानने ‘हमशकल्स’ चित्रपटाच्या सेटवर महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्याचं आठवत नाही, असं सैफ म्हणाला. ‘जर माझ्यासमोर असं काही घडलं असतं, तर मलाच ते पसंत पडलं नसतं. महिलांना तुच्छ वागणूक मिळणाऱ्या वातावरणातच मला रहायची इच्छा होत नाही.’ असंही सैफने सांगितलं.

अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.