‘बेबो’ करीनाच्या ‘या’ नणंदबद्दल कोणालाच माहिती नाही, सांभाळते पतौडी खानदानाची कोट्यवधीची संपत्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पतौडी खानदानातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमध्ये फेमस आहे. शर्मिला टॅगोर, सैफ अली खान, सोहा अली खान, करीना कपूर आणि आता सारा अली खान यांनी सिनेमात आपल्या अदाकारीचा जलवा दाखवला आहे. या कुटुंबातील एक सदस्य अशी आहे जिचं बॉलिवूडसोबत दूर दूर पर्यंत नातं नाहीये. ही व्यक्ती आहे सैफ अली खानची बहिण सबा अली खान. सबा सैफची लहान बहिण आहे आणि सोहा त्याच्याहून मोठी आहे.

saba ali khan

सबा नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहिली आहे. त्यामुळे तिच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असेल. ती काही फंक्शन्स सोडले तर कुठेच दिसत नाही. सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे. सबा खूपच लाजाळू आहे. हेच कारण आहे की, तिनं कधी सिनेमात येण्याबद्दल विचारच केला नाही. तिनं आपली डायमंड रेंज सुरू केली आहे. एका मुलाखतीत बोलताना सबा म्हणाली होती की, मी कधीच अ‍ॅक्टींगमध्ये येण्याचा विचार केला नाही. मला आनंद आहे की, मी जे काम करत आहे त्यात मी खूप नाव कमावलं आहे.

saba ali khan

सबानं तिची वहिणी करीना कपूरसाठी अनेकदा ज्वेलीर डिजाईन केली आहे. 42 वर्षीय सबानं अद्याप लग्न केलेलं नाही. करीना आणि सबा यांची खूप खास बाँडिंग आहे. आपल्या बिजनेसव्यतिरीक्त सबा नवाब खानदानाची कोटींची संपत्ती सांभाळते.

saba ali khan

संपत्तीचं काम पाहण्यासाठी ओकाफ-ए-शाही नावाची संस्थाही आहे. सबा या संस्थेची प्रमुख आहे. त्यामुळे पतौडी खानदानाच्या सर्व संपत्तीचा ती हिशोब ठेवते. आपल्या बिजी शेड्युलमुळे ती चर्चेत न राहता कायमच कामात व्यस्त असते.

saba ali khan