आदिपुरुष : ’लंकेश’ बनण्यास सैफ अली खान तयार, म्हणाला – ‘राक्षस बनण्यात मजा येईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुषची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडचा सर्वांत मोठा चित्रपट असल्याचे सांगण्यात येत असलेल्या आदिपुरुषबाबत प्रत्येकजण उत्सुक आहे. चित्रपटात सैफ अली खान लंकेश बनणार आहे.

सैफ अली खान लंकेश बनणार असल्याने चित्रपट आणखी इंट्रेस्टिंग होणार आहे. तानाजीमध्ये निगेटिव्ह रोल प्ले करून आपली क्षमता सिद्ध करणारा सैफ आता लंकेश बनून चित्रपटाला आणखी मोठा बनवत आहे.

स्वत: सैफ अली खानसुद्धा या भूमिकेसाठी खास तयारी करत आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या इंटरव्ह्यूत सैफने सांगितले की, तो या रोलसाठी उत्सुक आहे. तो म्हणतो – असा राक्षस बनण्यात मजा येईल. आम्ही हे पात्र जरा मजेदार बनवू, आम्ही समजावण्याचा प्रयत्न करू की, रावणाने सीतेचे अपहरण अखेर का केले होते. आम्ही प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देऊ.

सैफ म्हणतो की, तो लंकेशची भूमिका करताना सूडाची भावना सतत लक्षात ठेवणार आहे. लंकेशची ती बाजू उठून दिसणे आवश्यक आहे. आता सैफने या चित्रपटाची तयारी तर सुरू केली आहे, परंतु त्याचा लुक किंवा पोस्टर रिलीज करण्यात आलेले नाही.

आदिपुरुषमध्ये राम बनलेल्या प्रभासला त्याची सीतासुद्धा मिळाली आहे. या मेगाबजेट चित्रपटात अभिनेत्री कृती सेननला सीतेचा रोल ऑफर करण्यात आला आहे. कृतीने या भूमिकेसाठी होकार दिला आहे.

अगोदर सीतेच्या रोलसाठी बाहुबलीची देवसेना ऊर्फ अनुष्का शेट्टीचे नाव चर्चेत होते. परंतु, नंतर मेकर्सने या मोठ्या रोलसाठी कृती सेननची निवड केली. यापूर्वी पानिपतसारख्या चित्रपटातसुद्धा कृती दिसली आहे. चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू झाले नसून 2022 मध्ये तो रिलीज करण्याची तयारी आहे. अनेक भाषांमध्ये चित्रपट रिलीज होईल.