सैफ अली खानची ‘ही’ अविवाहित बहीण तब्बल 27 हजार कोटींची मालकीण!

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पतौडी या शाही कुटुंबातील जवळपास सगळेच सदस्य बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीना कपूर यांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सैफची आणखी एक बहिण आहे जी बॉलिवूडपासून लांब आहे. तिचे नाव सबा अली खान असे असून ती बिझने वुमन आहे. सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे.

तिचा जन्म मुंबईमध्ये झाला. तिने दिल्लीमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने ज्वेलरी डिझाइनचे पुढचे शिक्षण अमेरिकेत जाऊन घेतले. सबाने लहानपणापासूनच लाइमलाइट पासून दूर राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे आज फार कमी लोकांना माहित आहे की सैफ आणि सोहाला आणखी एक बहिण आहे. तसेच तिचे स्वत:चे डायमंड रेंज आहे. तिने करीना कपूरची ज्वेलरी डिझाइन केली आहेत. तिने अद्याप लग्न केलेले नाही.

सबा अली खान ही बॉलिवूडपासून लांब असली तरी ती कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सबाकडे जवळपास २७०० हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.