सायली गाजरे निफाड तालुक्यातील लष्करात कार्यरत असलेली पहिली युवती

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना ने संपूर्ण देशाला जेरीस आणले असून सध्या लोक घराबाहेर पडतांना घाबरत आहे मात्र अशा परिस्थितीत निफाड तालुक्यातील गाजरवाडी या ठिकाणी राहणारी सायली बाळासाहेब गाजरे ही तरुणी आपल्या जीवाची परवा ना करता देशा ची रक्षणाकरता सीमेवर निघालेली आहे देश सेवेसाठी सायलीने आर्मी जॉईन केली असून या बिकट परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील देश सेवेत रुजू होणारी सायली गाजरे ही निफाड तालुक्यातील पहिली तरुणी ठरली आहे संपूर्ण तालुक्यातुन सायलीचे कौतुक होत आहे.

शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सायलीचे
आई-वडील यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे सायलीने आर्मीत जाण्याचा दृढनिश्चय केला व पंधरा किलोमीटर दूर असलेल्या निफाड येथील पावर हाउस करिअर अकॅडमी प्रवेश घेतला दररोज सायकलने अकॅडमी येण्यास सुरुवात केली अकॅडमीचे संचालक असीम शेख यांनी सायली कडून खूप सराव करून घेतला तिच्या जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे ती सराव करताना सर्व मुलींना पेक्षा पुढे पळत होती सराव झाल्यानंतर दिवसभर अभ्यास करून घरी शेताचे काम करायची 2019 साली तिने आर्मी चे फॉर्म भरला व सहा महिन्यानंतर तिला मैदानी चाचणी ची हॉल तिकीट आले आम्ही तिला मैदानी चाचणीसाठी नाशिक येथील सीआयएसएफ युनिट मध्ये घेऊन गेलो पहाटे चार वाजता मैदानी सुरुवात झाली शंभर मुलींमध्ये सायलीने पहिला क्रमांक मिळवला एका शेतकर्‍याच्या मुलीने जिद्दीची जोरावर तिने नाशिक जिल्ह्यातील पहिली महिला फौजी घेण्याचा बहुमान मिळवला व असिम शेख यांचे मार्गदर्शन आणि संपादन केले आज फक्त निफाड तालुका नव्हे तर पूर्ण नाशिक जिल्ह्यात त्याचा सार्थ अभिमान आहे.