बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह, थायलंडमध्ये झाली ‘क्वारंटाईन’

पोलिसनामा ऑनलाईन टीम : बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. मध्यंतरी कोरोना काळात सर्व खेळ बंद होते. दरम्यान, थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला. भारतीय खेळाडू सायना नेहवाल हिची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे.

सायना नेहवालसह भारताच्या आणखी काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, क्वारंटाईन चा तिसऱ्या कोरोना चाचणीत तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. एच एस प्रणॉयलाही कोरोना झाल्याचे वृत्तसमोर येत आहे, तर सायनाचा पती पारुपल्ली कश्यप याला वैद्यकिय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.