सायना नेहवालचा बायोपिक येणार : सप्टेंबरपासून शूटिंग सुरु

मुंबई: पोलीसनामा  ऑनलाईन

फुलराणी सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा होत होती, मात्र कधी आणि कोठे याच चित्रीकरण होणार  हे मात्र  निश्चित नव्हते . पण अखेर या चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे, पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई आणि हैदराबादमध्ये होणार आहे.  या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार आहे. सायनाची भूमिका साकारण्यासाठी  श्रद्धा  खूप कष्ट घेताना दिसत आहे . सायनाची भूमिका साकारताना त्यात कोणतीही उणीव राहू नये यासाठी श्रम घेत आहे,  त्यासाठी श्रद्धाने आपला दिनक्रम ही बदलून घेतला आहे, तिच्या ‘स्त्री’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ या दोन आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून वेळात वेळ काढत ती सायनाच्या चित्रपटासाठी सराव करताना दिसतेय.

[amazon_link asins=’B01HX9VF6S,B078TF9V6L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03562dd6-aab2-11e8-b94c-3fc3ff656970′]

बॅडमिंटन हा एक अवघड आव्हानामक खेळ आहे. परंतु मी आनंद घेत याचा सराव करत आहे. मागील काही दिवसापासून मी  सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.  सायनाची कामगिरी फार मोठी असून  मला असून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे. पुढच्या महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होत असून बॅडमिंटन खेळाची दृश्ये मात्र पुढच्या वर्षीच चित्रीत करण्यात येतील’ असं श्रद्धाने एक वृत्त संस्था बोलताना सांगितलं.

माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन , कवी वरवर राव यांना अटक

कोणत्याही खेळाडूवर आत्मचरित्रपट काढण्यासाठी  एक विशिष्ठ प्रकारे मेहनत घ्यावी लागते, आता सायनाची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारायची म्हणजे श्रद्धाला बॅडमिंटनच्या कोर्टवर घाम तर गाळावा लागणारच. यात  किंचीत ही शंका नाही.  मात्र या चित्रपटाचे नाव काय असणार आहे हे ठरलेले नाही,  यावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही.  पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या आधी धावपटू मिल्खासिंग, क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी,  बॉक्सर मेरी कॉम, इत्यादी खेळाडूंवर आत्मचरित्रपट आले आहेत.