माजी सैनिकांच्या ‘अनाथ’ मुलांना मिळणार 20 हजारांची मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – माजी सैनिकांच्या अनाथ मुलं पेंशन स्वीकृतीसाठी पात्र होत नाही तोपर्यंत उदारनिर्वाहसाठी आता विभागाकडून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पहिल्यांदा ही रक्कम 10 हजार रुपये होती. ही रक्कम विभागाकडून दुप्पट करण्यात आली आहे. जोपर्यंत या अनाथ मुलांना पेंशन मिळणार नाही तो पर्यंत त्यांना अशा प्रकारे एकखट्टी रक्कम विभागाकडून देण्यात येईल.

सैनिक कल्याण विभाग पुनर्निमाण आणि पुन : स्थापना निधीमधून आश्रित अनाथांना आर्थिक सहायत्ता मिळते. अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्या सैन्य दलातील वडीलांचा किंवा आईचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी थेट मुलांना वडीलांची पेंशन तात्काळ लागू होत नाही. पेंशन संबंधित कागदपत्रांच्या प्रक्रियेला वेळ लागतो. अशा वेळी या मुलांपुढे कठीण परिस्थिती उद्भवते. अशा वेळी ही अनाथ मुलं सहायत्ता रक्कमेसाठी अर्ज करु शकतात.

मुलांचे 25 वर्ष वय होण्यापूर्वी आणि मुलीचे लग्न होण्यापूर्वी ही रक्कम मिळेल. जर माजी सैनिकांची अनाथ मुलं 25 वर्षांपेक्षा जास्त वयाची असतील किंवा मुलीचे लग्न झाले तर ही रक्कम मिळणार नाही.आता 10 हजार ऐवजी 20 हजार रुपये एकखट्टी मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/