आर्चीच्या कार्यक्रमात नागरिक ‘सैराट’, 6 जणांविरोधात FIR

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – आर्चीची एक झलक पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. आर्ची येणार म्हटल्यावर लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी करतात. मात्र कोरोनाच्या काळात हाच प्रकार सहा जणांना महागात पडला आहे. सैराट चित्रपटानंतर आर्ची-परश्याची जोडीला लोकांनी डोक्यावर उचलून घेतले. अजही ही जोडी कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचे समजल्यावर मोठी गर्दी होती. मात्र, चाहत्यांचं हे वेड कोरोनाला पूरक ठरु शकतं, याचा विसर पडल्याचे पहायला मिळत आहे.

सारखणी इथल्या लेंगी महोत्सवाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मोहोत्सवाला सैराट फेम आर्चीला बोलावल्याने 16 फेब्रुवारी रोजी मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मास्कचा वापर केला नसल्याचे दिसून आले. तसेच सोशल डिस्टन्सचे पालन केले नव्हते. याबाबत किनवट तालुका महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

यानुसार एकूण सहा आयोजकांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक नियम आणि भादवीच्या कलम 188, 269,270 आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सारखणी इथले या कार्यक्रमाचे संयोजक असलेले सहा जण अडचणीत आले आहेत.