लाडक्या ‘आर्ची’ला १२ वीत मिळाले ८२ % गुण ; जाणून घ्या कोणत्या विषयात किती गुण मिळाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट फेम आर्चीनेदेखील बारावीची परीक्षा दिली होती. आर्चीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, आता आर्ची बारावीची परीक्षा पास झाली आहे. तुम्हाला तिचे टक्के वाचून नक्कीच आनंद होणार आहे. आर्चीला म्हणजेच रिंकु राजगुरुला बारावीत 82 टक्के मार्क्स मिळाले आहेत. आर्ची जेव्हा दहावीत होती तेव्हा तिला म्हणावं तितकं नियमित शाळेत जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिला बाहेरूनच दहावीची परीक्षा द्यावी लागली होती. जेव्हा तिचा दहावीचा निकाल लागला होता तेव्हा तिच्या निकालाचीही सोशलवर चांगलीच चर्चा झाली होती. आता या निकालाने रिंकुचे कौतुक होताना दिसत असून ती पुन्हा चर्चेत आली आहे. रिंगू राजगुरुला मराठीत 86, भूगोलमध्ये 98, इतिहासात 86, राज्यशास्त्र विषयात 83, अर्थशास्त्रात 77 तर पर्यावरण स्टडी विषयात 49 गुण मिळालेत. तिला एकूण 7 विषयात 650 पैकी 533 गुण मिळाले आहेत.

रिंकु नुकतीच कागर या सिनेमात झळकली होती. या सिनेमात ती शुभंकर तावडेसोबत काम करताना दिसली होती. रिंकुचे आणि शुभंकरचे एक रोमँटीक गाणे रिलीज झाले होते. लागलीया गोडी तुझी असे या गाण्याचे नाव होते. हे गाणंही प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते. या सिनेमात एक नागीन डान्स नावाचे उडत्या चालीचे गाणेही चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान रिंकु लवकरच एका वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. त्यात ती खूपच हटके आणि बोल्ड रोलमध्ये दिसणार आहे. मेकअप असं या वेब सीरीजचं नाव आहे. याचा टीझर समोर आला होता. सोशलवर हा टीझर व्हायरल झाला होता.

दरम्यान यंदाचा बारावीचा निकाल हा 90.25 टक्के लागला आहे. या वर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वाधिक निकाल हा कोकणातील असून 93.23 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूरचा असून तो 81.51 टक्के इतका लागला आहे.