Sairat Fame Actor Arbaj Shaikh | सैराटमधील सल्याला पुण्यातील रिक्षावाल्यानं लुटलं ?, शिवीगाळ अन् मनस्ताप…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sairat Fame Actor Arbaj Shaikh | पुण्यातील रिक्षावाल्यांकडून (Autorickshaw Driver In Pune) होणारा मनस्ताप काही नवीन नाही. कधी भाड्यात लूट तर कधी पातळी सोडून वर्तन. रिक्षाचालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाच्या वारंवार घटना घडत आहेत. यावर प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. पुण्यात रिक्षावाल्यांकडून लूट होत असल्याचे अनुभव पुणेकर सांगतात. यातच आता सैराट मधील सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेख (Sairat Fame Actor Arbaj Shaikh) याला देखील असाच अनुभव आला आहे. अरबाज शेख याने फेसबुक पोस्ट (Facebook Post) करुन त्याच्याबाबतीत काय घडले याची माहिती दिली आहे. (Pune Crime)

 

सैराट फेम सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेख (Sairat Fame Actor Arbaj Shaikh) सध्या पुण्यात राहतो. पुण्याहून गावी निघाला असताना पुणे स्टेशनपर्यंत (Pune Station) पोहोचण्यासाठी त्याने रिक्षा पकडली. त्यावेळी त्याला धक्कादायक अनुभव आला. रिक्षाचालकाने त्याला चुकीच्या मार्गाने नेत त्याच्याकडे जास्तीचे पैसे (Robbed) उकळले. तसेच त्याला शिवीगाळ (Swearing) केली. त्याने हा धक्कादायक अनुभव एका पोस्टमधून व्यक्त केला असून प्रशासनाकडे मदत मागितली आहे.

 

अरबाजने लिहिले की, पुण्यात रिक्षावाल्या कडून लूट… सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही… नाव असिफ मुल्ला… रिक्षा नंबर MH 12 NW 9628… नांदेड सिटी (Nanded City) ते पुणे स्टेशनला यायला 198 रुपये होतात.
मी कधीच ओला (Ola), उबेर (Uber), रॅपिडो (Rapido) सारख्या अ‍ॅपचा वापर करत नाही. पाऊस (Pune Rain) असल्याने मित्राने सोडण्यासाठी नकार दिला.
त्यामुळे मित्राने मला रॅपिडोवरुन रिक्षा करुन दिली. पाऊस चालू होता.
नांदेड सिटीमधून रिक्षा निघाली त्याने मला खूप फिरवले. मी त्याला म्हटलं दादा तू खूप फिरवतो आहेस.
त्यावर त्याने काहीही उत्तर दिले नाही.

 

पुढे तो म्हणतो, प्रवासादरम्यान 60 रुपये जास्तीचे मागायला त्याने सुरुवात केली.
मी का असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्या रिक्षाचालकाने मला शिवी देत म्हणाला, पाऊस सुरु आहे.
तू इथेच उतर. जास्त बोलू नको.
मी रोज रिक्षा चालवतो.. तू नाही. तुला 60 रुपये जास्तीचे द्यावे लागतील. नाहीतर इथेच उतर.

 

पाऊस सुरु असल्याने तसेच ट्रेन पकडायची असल्याने अरबाज प्रवासादरम्यान उतरू शकला नाही.
पण हा प्रकार थांबावा यासाठी अरबाजने लिहिलं आहे,
माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर अशा प्रसंगाचा सामना करावा लागत असेल तर गावावरुन फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील…
त्यांची हे लोक किती लूट करत असतील. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढेल,
अशी पोस्ट अरबाज ने केली आहे.

 

Web Title :- Sairat Fame Actor Arbaj Shaikh | sairat fame actor salya arbaj shaikh got robbed and abused at pune railway station by autorickshaw driver pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा