रिंकू राजगुरु सांगतेय, माझ्या गावातील लोकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये आहे ‘हा’ मोठा फरक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) हिने ‘सैराट’ चित्रपटानंतर ‘कागर’ चित्रपटातून दमदार एन्ट्री केली. पहिल्याच चित्रपटातूनच तिने चाहत्यांवर आपली छाप टाकली. तिला केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभर लोकप्रयता मिळाली. जगभर तिचे चाहते झाले तरी देखिल तिला चाहत्यांना पाहून असे वाटते.

सैराट चित्रपटानंतर रिंकूचा चाहता वर्ग झपाट्याने वाढला. तिचे कौतुक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी देखीले केले. ‘कागर’ या चित्रपटाचे शुटिंग रिंगूच्या गावात झाले. याविषयी ती बोलताना सांगते की, मी आणि मकरंद एकाच गावातील आहोत. त्यामुळे आम्हाला भेटायला अनेकजण यायचे. त्यामुळे खुप गर्दी व्हायची. माझे चाहते माझ्यासोबत फोटो काढून काही न बोलता तसेच निघून जायचे. पण माझ्या गावातील लोक खुप वेगळे आहे. ते माझ्याशी येऊन बोलतात. मला आशीर्वाद देतात. माझे कसे काय सुरु आहे हे विचारतात, माझ्यासाठी घरात बनवलेल्या गोष्टी आणून देतात. याचा मला खुप आनंद होतो.

https://www.instagram.com/p/BnyTIfKheIc/

ती पुढे म्हणाली की, मला मिळालेले यश मला सांभाळून ठेवायचे आहे. प्रसिद्धीमुळे माझ्यात अजिबात बदल झाला नाही. मी आजही सगळ्यांशी पहिल्यासारखी वागते. मी स्टारडमचा विचार करत नाही. मला लोक एखाद्या स्टारसारखे वागवतात त्यावेळी मला ते खुप विचित्र वाटते. मी वयाने लहान आहे तसेच मला वागवा.