‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूनं सांगितलं वजन कमी करण्यासाठी काय काय केलं ? जाणून घ्या ‘सिक्रेट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सैराट चित्रपटातून लोकांसमोर आलेली आणि लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आज मराठीतील टॉप अॅक्ट्रेसेपैकी एक आहे. सैराटनंतर रिंकुनं अनेक सिनेमात आणि वेब सीरिजमध्येही काम केलं. परंतु सैराटमध्ये शरीरानं टंच दिसणारी आर्ची आता अचानक स्लिम ट्रीम झाली आहे. रिंकूनं तिचं वजन घटवल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत रिंकूनं याबद्दल खुलासा केला आहे.

मुलाखतीत बोलताना वजन कमी करण्याचं सिक्रेट सांगताना रिंकू म्हणाली, “मी जेवणापूर्वी अर्धा तास पोटभर पाणी पिते. यामुळं मला भूक कमी लागते. स्लिम ट्रीम राहण्यासाठी मी रोज सकाळी योाग करते. दिवसातून तीन तास मी नृत्याचा सराव करते. भरतनाट्यम शिकण्यासाठी मी विशेष मेहनत घेते.”

चाहत्यांना वजन कमी करण्यासाठी काय सल्ला देशील असं विचारल्यानंतर रिंकू म्हणाली, “तुम्ही किमान प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी प्यायला हवं. पाणी जास्त पिल्यानं पोटाचे आजार होत नाहीत. चेहऱ्यावर फोड येत नाहीत.” असंही तिनं सांगितलं.

https://www.instagram.com/p/B_tv1FQp4zS/

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती हंड्रेड वेब सीरिजमध्ये दिसली आहे. लवकरच ती झुंड या हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे. तिच्या लुकचं पोस्टरही रिलीज झालं आहे. तिनं मेकअप, कागर अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B-bSuuBJODK/

https://www.instagram.com/p/B8QF23IJkH_/

https://www.instagram.com/p/B6uYvILJ3om/

https://www.instagram.com/p/B6S1nk-JNcs/

https://www.instagram.com/p/B4KEitpJU5H/