नागराजच्या ‘या’ चित्रपटात पुन्हा झळकणार ‘आर्ची परशा’

मुंबई : वृत्तसंस्था –  २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. रिंकू आणि आकाश यांचे असंख्य चाहते निर्माण झाले. मात्र गेल्या अडीच वर्षांत दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी मिळाली नाही. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता, खुद्द नागराज मंजुळेच पुन्हा दोघांना एकत्र आणणार आहेत.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांचीदेखील ‘झुंड’ चित्रपटात भूमिका आहे. या चित्रपटाचे अनेक अपडेट्सही त्यांनी चाहत्यांशी शेअर केले आहेत. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. तर रिंकू आणि आकाश या संस्थेतील फूटबॉलपटूंच्या भूमिकेत आहेत.
सैराटनंतर रिंकू राजगुरुची भूमिका असलेला ‘कागर’ हा दुसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सैराट चित्रपटानंतर आकाश ठोसर महेश माजरेकरांच्या ‘फ्रेण्डशिप अनलिमिटेड’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये राधिका आपटेसोबत झळकला होता.