Saiyami Kher | ‘बॉडी शेमिंग’बाबत सैयामी खेर चर्चेत; म्हणाली “माझे ओठ आणि…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली होती. मात्र, आता तिच्या एका वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. मध्यंतरीच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील वर्णभेदाबद्दल भाष्य केले होते, तर आता अभिनेत्री सैयामीने बॉडी शेमिंगवर वक्तव्य केले आहे. (Saiyami Kher)

 

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेकदा माझ्या रंगावरून रूपावरून मला बोलले गेले होते, असे म्हणत सैयामीने नाव न घेता तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “अनेकदा असं होतं की लोक तुमच्याबद्दल मत बनवतात आणि त्यावरच तुम्हाला पारखत असतात. जेव्हा मी या क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा मला कित्येकांनी माझ्या ओठांची आणि नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. मी मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. पण ही गोष्ट खूप वाईट आहे असंच मला वाटते आणि मी लोकांना एक सल्लादेखील देऊ इच्छिते की, आपल्या आजूबाजूला अशी संवेदनशील माणसे असतात आपण नकळत त्यांना दुखावू शकतो. यामुळे आपण काय बोलतो याकडे आपले नेहमीच लक्ष पाहिजे”.

 

सैयामीने 2015 मध्ये तेलगू चित्रपट ‘रे’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
त्यानंतर तिने राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘Mirzya’ या चित्रपटातून हिंदीमध्ये काम करायला सुरुवात केली होती,
तर ती नुकताच अनुराग कश्यपच्या ‘चोक्ड’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीद : इनटू द शॅडो’ या वेब सीरिजमध्येदेखील महत्त्वाची भूमिका तिने साकारली होती.
ती लवकरच आता अश्विनी अय्यर यांच्या आगामी वेब सीरिजमध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title :- Saiyami Kher | bollywood actress saiyami kher share her experience of body shaming in film industry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…