Sanjay Raut | अटकेची घाई, सुनवाई मात्र नाही; विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशाची ईडीवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर सुनावणी (Bail) करताना कोर्टाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला (ED) जोरदार फटकारलं आहे. “ईडीला फक्त अटकेची घाई असते. परंतु विशेष पीएमएलए कोर्ट (PMLA Court) स्थापन झाल्यापासून आरोपपत्र आणि आरोप निश्चिती करुन एकाही प्रकरणाची सुनावणी झालेली नाही, याची नोंद घेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे (M G Deshpande) यांनी ईडीला सुनावले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करता, परंतु खटले संथ गतीने चालतात, या ईडीच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका त्यांनी केली.

 

आपल्या आदेशात न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी नमूद केले, “मी सध्या अध्यक्ष असलेल्या न्यायालयासमोर स्थापन झाल्यापासून एकही खटला पूर्ण झालेला नाही आणि याचं श्रेय ईडीला जाते.
ईडीने पुराव्यांद्वारे निष्कर्ष काढला आहे आणि न्यायालयाला गेल्या दशकापासून एकही निर्णय देता आलं नाही.
कोर्टाच्या स्थापनेपासून आणि माझ्या संपूर्ण कार्यकाळात एकही निर्णय झालेला नाही.”

 

“ईडीला केवळ पीएमएलएचे कलम १९ (कोठडी) आणि ४५ (जामीन) माहित आहेत असं दिसतं.
परंतु पीएमएल कायद्याच्या कलम ४४ नुसार गुन्ह्याचा खटला चालवण्याची तरतूद आहे हे ईडी (ED) विसरली आहे.
पीएमएलए विशेष प्रकरणांमध्येही पुरावे नोंदवावे लागतात, खटले चालवावे लागतात आणि निवाडे द्यावे लागतात
हे ईडी विसरत आहे, जे दुर्दैवी आहे,” असं न्यायाधीशांनी आदेशात नमूद केलं.

 

Web Title :- Sajay Raut | special pmla court slams ed in sanjay raut bail said ed arrests accused at extraordinary pace but conducts trial at snails pace

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Mahesh Tapase | भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे का? – महेश तपासे