Sajid Khan | साजिद खानच्या अडचणीत वाढ! आणखी एका अभिनेत्रीने केली लैंगिक छळाची तक्रार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बिग बॉसचं 16 (Big Boss 16) वा हंगाम चालू आहे. यामध्ये बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. सध्या साजिद खानवर अनेक अभिनेत्री लैंगिक छळाचे आरोपी करत आहेत. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) याच्या विरोधात लैंगिक छळाची (Sexual Harassment) तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) शनिवारी रात्री हि तक्रार दाखल केली.

 

हि तक्रार दाखल केल्यानंतर शर्लिनने माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली कि, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे. तसेच, पोलिसांनी आश्वासन दिलंय की, ते साजिद खानला (Sajid Khan) लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बोलवून त्याचा जबाब नोंदवतील. “जुहू पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा करावी. मग आरोपी कोणीही असो, तो फराह खानचा (Farah Khan) भाऊ असो किंवा सलमान खानचा (Salman Khan) लाडका असो. आज आरोपी बिग बॉसच्या घरात बसून आराम करतोय. मला न्याय हवाय. त्यासाठीच मी पोलिसांकडे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी आणि योग्य तो तपास करुन आरोपी साजिद खानला अटक करावी.”

साजिद खान 2018 सालापासून वादात सापडला आहे. बॉलीवूडमध्ये #MeToo हि मोहीम सुरु झाल्यानंतर
अनेक अभिनेत्रींनी त्यांना झालेल्या लैंगिक छळाचा खुलासा केला होता.
दरम्यान, अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते.
यामुळे साजिदला वर्षभर इंडस्ट्रीत काम न करण्याचे आदेश देण्यात आले होते.
आताची सगळी परिस्थिती बघता साजिद खानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Web Title :- Sajid Khan | actress sherlyn chopra has filed a harassment complaint against sajid khan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा