Saki Naka Rape Case | ही घटना दुर्दैवी; साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास 1 महिन्यात – CP हेमंत नगराळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Saki Naka Rape Case | साकीनाका परिसरात (Saki Naka Rape Case) माणुसकीला काळीमा फासणारी घृणास्पद अमानुष घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्याच्या पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे. या दुर्देवी घटनेच्या तपासाच्या पार्श्वभुमीवर मुंबईचे (Mumbai) पोलिस आयुक्त हेंमत नगराळे (CP Hemant Nagarale) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. साकीनाकातील ती घटना दुर्दैवी आहे. 3:20 मिनिटांन पुट्याच्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिस नियंत्रण कक्षालाही माहिती दिली. यानंतर पोलिस 10 मिनिटांत घटनास्थळी पोहचले. राजावाडी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु केले. सुरक्षा रक्षकाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास (Investigation) सुरू केला. CCTV फुटेजवरून पोलिसांनी उत्तरप्रदेश जौनपूरच्या मोहन चौहानला (Mohan Chauhan) अटक केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

आयुक्त नगराळे (CP Hemant Nagarale) म्हणाले की, मोहनच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले कोर्टाने त्यांना 21 पर्यंत पोलिस कोठडी (Police cell) दिलीय. ज्योत्स्ना रासम (Jyotsna Rasam) यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. 1 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात येईल, असं आश्वासन देखील नगराळे यांच्याकडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर (Fast track) चालवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान, पुढे बोलताना आयुक्त नगराळे म्हणाले की, उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने हत्येचं कलम देखील वाढवलेलं आहे.
या गुन्ह्यामध्ये एकच आरोपी असून दुसरा आरोपी नाही,
त्यामुळे त्यातील 34 कलम (Article 34) काढण्यात आलं आहे.
पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही.
परंतु, लवकरच वस्तूस्थिती समोर येईल.
असं देखील पोलिस आयुक्त हेंमत नगराळे (CP Hemant Nagarale) सांगितलं आहे.

Web Titel :- Saki Naka Rape Case | sakinaka rape case investigated 1 month assurance mumbai cp hemant nagarale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Nagpur | पोलीस ठाण्यात मोर्चा जाताच उलगडलं खूनाचं रहस्य, दोन जणांना केली अटक

Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण

Modi Government | नोकरीचे टेन्शन संपले ! मोदी सरकारच्या योजनेत अर्ज करून लवकर कमवा जास्त पैसे, जाणून घ्या