Sakianaka Rape Case | बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साकीनाका येथे बलात्कार (Sakianaka Rape Case) झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शनिवारी (दि.11) या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजावाडी रुग्णालयात (victim woman died rajawadi hospital) या महिलेवर उपचार सुरु होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच नाजूक बनली होती. पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि अखरे बालात्कार झालेल्या (Sakianaka Rape Case) महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईसह देशात संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली होती. चाकूचा धाक दाखवून पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपीने महिलेवर अनैसर्गिक अत्यारही केले. नराधमाने सर्व सीमा पार करत पीडित महिलेच्या गुप्तांगात रॉड टाकून (After rape put a rod in the private part of the girl ) गंभीर दुखापत केली होती. आरोपीने केलेल्या या कृत्यामुळे पीडित महिलेची प्रकृती खूपच नाजूक बनली होती. अखेर शनिवारी महिलेची मृत्यूची झुंज संपली. याप्रकरणात तक्रारदार असलेल्या सुरक्षा रक्षकाने दोन व्यक्ती महिलेला धमकावत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला केला होता.

या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जाते आहे. भाजप (BJP) नेत्या चित्रा किशोर वाघ (Chitra Kishor Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. साकीनाका पीडितेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण, या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही, त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतानं. नाही वाचवू शकलो तुला.

Web Titel :- Sakianaka Rape Case | mumbai sakinaka rape case victim woman died rajawadi hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Maharashtra | कोरोनाच्या दुसर्‍या वर्षात ‘लाचखोरी’ची लागण ! महसुल अग्रस्थानी मात्र ‘वसुली’त पोलिसांची आघाडी, ‘कॉन्स्टब्लेरी’च जाळ्यात अडकण्याचे प्रमाण अधिक

Gold Price Update | सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीदारांची ‘चांदी’, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामात ‘टर्मिनेट’ केलेल्या कंपनीची ‘जायका’ नदीसुधारसाठी निविदा; ‘जॉंईट व्हेंचर’मध्ये मदत केल्याने अडचणीत !