भाजप आमदाराच्या मुलीला ‘इंस्टा’वर जीवे मारण्याची धमकी, 50 लाखाची सुपारी घेतलीय 3 महिन्यात मारून टाकेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश मधील भाजपाचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने नुकताच प्रेम विवाह केला. मात्र साक्षीला आता इंस्टाग्रामवरून धमकीचे संदेश आले आहेत यात साक्षीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे तसेच धमकी देणाऱ्याने आपण ५० लाखांची सुपारी घेतली असल्याचेही सांगितले आहे.

यावर साक्षिने मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत साक्षी म्हणते मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी येत आहे मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीय. माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे असेही साक्षीने यावेळी म्हंटले आहे.

सोमवारी साक्षीला इंस्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीने मेसेज केला ज्यात त्याने तो गँगस्टर असल्याचे सांगत त्या दोघांना मारण्याची ५० लाखांची सुपारी घेतली असल्याचे सांगितले. या आधी देखील साक्षीच्या नवऱ्याला ट्विटरवर धमकी देण्यात आली होती याची पोलिसांत तक्रारही देण्यात आली मात्र पोलिसांकडून या बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याचे साक्षिने सांगितले.

एसएसपी शैलेश पांडेय यांनी सांगितले की, अद्याप त्यांच्यापर्यंत या बाबत कोणतीही माहिती आलेली नाही. याबाबतची पूर्ण माहिती ज्यावेळी येईल त्यावेळी ते यावर योग्य ती कारवाई करतील.

साक्षीने सांगितले की, त्यांना रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या येत आहेत. यामुळे त्यांचे घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे आणि त्यांना घाबरत घाबरत आयुष्य जगावे लागत आहे. साक्षीचा पती जातीने दलित आणि वयाने सहा वर्ष मोठा असल्यामुळे सोशल मीडियावर आमच्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत असे साक्षीने सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like