राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच पगार ! पण मिळणार नाही ‘तो’ भत्ता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी कर्मचाऱ्यांनसाठी केंद्र सरकारने सणासुदीच्या दिवसांआधीच भेट म्हणून काही महत्वाचे निर्णय जाहीर केले होते. सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये मिळणारे वेतन दिवाळीच्या तीन दिवस आधी म्हणजे २४ ऑक्टोबरला दिले जाणार आहे. निवृत्ती वेतनाबाबतही हाच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही पेन्शन मिळणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी यांनाही दिवाळीपूर्वी वेतन/निवृत्तीवेतन दिले जाईल. या अनुषंगाने सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी २४ ऑक्टोबरला देण्यात येणार आहे. वित्त विभागाने बुधवारी तसा आदेश काढला आहे.

कर्मचारी वाढीव महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत
ठरलेल्या वेतनासोबत सणासुदीच्या काळात वाढीव महागाई भत्ता देखील मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती. केंद्र सरकारने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै, २०१९ पासून ५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे भत्त्याचा दर १७ टक्के झाला आहे. केंद्रानुसार महागाई भत्ता देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार, ही ५ टक्के वाढ ऑक्टोबर, २०१९ पासून लागू करावी आणि जानेवारीपासून ९ महिन्यांची थकबाकीही दिवाळीपूर्वी द्यावी,अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.

visit : policenama.com