7 लाख कर्मचार्‍यांना भेट, मे पासून मिळणार बंपर रक्कम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंजाब किंवा हिमाचल प्रदेशच्या सरकारी कर्मचार्‍यांसाठी मे महिना आनंदाची भेट घेऊन येणार आहे. या महिन्यात त्यांना बंपर रक्कम मिळणार आहे. दोन्ही राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग भेट देणार आहे. यामुळे दोन्ही राज्यांमधील सुमारे सात लाख कर्मचार्‍यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

पंजाबमध्ये लागू
पंजाबच्या काँग्रेस सरकारने 30 एप्रिल 2021 च्या नंतर कर्मचार्‍यांसाठी नवीन वेतनमान लागू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा ते लागू केले जाईल. हिमाचल प्रदेशचे सरकार पंजाबची धोरणे फॉलो करते. 2016 मध्ये पंजाबमध्ये 6 व्या वेतन आयोगासाठी पॅनलचे गठण झाले होते. त्याचा अहवाल येणार आहे. सॅलरीतील वाढ हा अहवाल पाहून दिली जाईल.

हिमाचलमध्ये लागू
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्यानुसार पंजाबने नवीन वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिमाचल सरकार सुद्धा तो लागू करेल. याचा फायदा कर्मचार्‍यांना राज्य सरकार देईल.

सरकारने नवीन पेन्शन योजनेच्या कर्मचार्‍यांसाठी रिटायर्मेंट आणि ग्रॅच्युएटीत वाढ केली आहे, जे 2003 ते 2017 पर्यंत रिटायर झाले आहेत. यामुळे त्यांना सुमारे 110 कोटी रुपयांचे फायदे दिले जातील. मुख्यमंत्र्यांनुसार, प्रदेश सरकारने नवीन पेन्शन योजनेंतर्गत मुळ वेतन, महागाई भत्ता आणि एनपीएचा भाग 10 टक्क्यावरून वाढवून 14 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने पंजाबचे 3.25 लाख सरकारी कर्मचारी आणि 3 लाखापेक्षा जास्त पेन्शनधारकांना लाभ होईल. या सोबतच हिमाचल प्रदेशच्या सुमारे अडीच लाख सरकारी कर्मचार्‍यांना सुद्धा लाभ होईल.