Salary Hikes | खूशखबर ! नोकरदारांसाठी यावर्षी मिळणार भरघोस वेतनवाढ – सर्व्हे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Salary Hikes | कोरोनाच्या (Coronavirus) महामारीमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे परिस्थिती बदलली असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान नोकरदारांसाठी एक महत्वाची माहिती समोर (Salary Hikes) आली आहे. वर्ष 2022 मध्ये नोकरदारांना चांगला वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी 10 टक्के वेतनवाढ देण्याच्या तयारीत आहेत. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळाल्यास ही पगारातील वाढ कोरोनाच्या कालावधीत पूर्वीच्या पातळीवर पोहोचणार असल्याचे एका अभ्यासातून समोर आलं आहे.

 

2022 साली कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 2021 साली सरासरी 8.4 टक्के पगारवाढ मिळाली होती. तसेच कोरोना महामारीपूर्वी 2019 साली सरासरी 9.25 टक्के पगारवाढ झाली होती. तसेच, यंदा व्यावसायावर कोरोना महामारीचा कोणताही प्रभाव होणार नाही. त्यामुळे कंपन्यांना नफा मिळवण्यास मदत होणार आहे. असं कॉर्न फेरी इंडियाच्या (Korn Ferry India) रिपोर्ट्सनुसार समोर आलं आहे. (Salary Hikes)

 

दरम्यान, चांगली जीवनशैली आणि अधिक पैशांमुळे साधारण 40 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारी आहे. त्यामुळे प्रतिभावंत कर्मचाऱ्यांना थांबवण्याचे आव्हानही कंपन्या पुढे असणार आहे. तसेच कंपन्यांना सध्या मोठा नफा मिळत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगल्या पगारवाढीची अपेक्षा आहे, असं देखील कॉर्न फेरी इंडियाने सांगितलं आहे.

 

गेल्या काही तिमाहीत कंपन्यांनी मोठा नफा झाल्याचे जाहीर केलं आहे. कंपन्यांना झालेला नफा व्यवसायाची कामगिरी, उद्योग मेट्रिक्स (Industry Metrics) आणि बेंचमार्किंग ट्रेंडवर (Benchmarking Trends) अवलंबून असणार आहे. त्याशिवाय प्रतिभावंत कर्मचाऱ्यांना थांबवण्याचे आव्हान देखील कंपन्यांपुढे असणार आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

IT सेक्‍टरमध्ये मिळणार सर्वाधिक वेतनवाढ –
या कर्मचा-यांना यंदा सरासरी 10.5 टक्के पगारवाढ देऊ शकणार आहे.
तसकेच कंज्‍युमर क्षेत्रात 10.1 टक्के, लाइफ सायन्स 9.5 टक्के, सर्व्हिस,
ऑटो आणि केमिकल कंपन्यामध्ये सरासरी 9 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यताही आहे.

 

Wi-Fi भत्ताही मिळणार –
काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची काळजी पाहाता कायमचे वर्क फ्रॉम होम हा पर्याय दिला आहे.
कॉर्न फेरी इंडियाच्या सर्व्हेमध्ये सामाविष्ट असलेल्या 786 कंपन्यांपैकी 60 टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाय-फाय भत्ता देणार असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, यामधील 10 टक्के कंपन्यांनी प्रवास भत्ता कमी करण्याचा व रद्द करण्याचा विचार करण्यात आला आहे.

 

Web Title :- Salary Hikes | salary hikes to reach pre covid levels in 2022 says Korn Ferry India study

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Scheme | 63 लाख शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर! आता मोदी सरकार देईल पूर्ण 16,000 रुपये, जाणून घ्या काय आहे प्लान?

 

PMSBY | दर महिना केवळ 1 रुपया जमा करून घेऊ शकता 2 लाखाच्या सुविधेचा फायदा, जाणून घ्या कसा?

 

Bombay High Court | 7 वर्षाच्या प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा