शासकीय वेतनाचा प्रश्न मार्गी ! विनाअनुदानित शिक्षकांचे पगार होणार दुप्पट, तर बिनपगारी शिक्षकांना मिळणार 11 हजार रुपये

पोलीसनामा ऑनलाईनः गेल्या अनेक वर्षापासून विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम करणा-या शिक्षकांचा शासकीय वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या शाळांमधील शिक्षकांना वेतन अनुदान देण्याचा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने नुकताच जारी केला आहे. या निर्णयानुसार ज्या शिक्षकांना आजपर्यंत शासकीय वेतन मिळत नव्हते. त्यांना दरमहा 10 ते 11 हजार रुपये, तर ज्या शिक्षकांना आधीपासून वेतन मिळत होते त्यांचे वेतन दुप्पट होणार आहे. तसेच निर्णयानुसार प्राथमिक 5 हजार 819, माध्यमिक 18 हजार 575 व उच्च माध्यमिकच्या 8 हजार 820 अशा एकूण 33 हजार 214 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन अनुदानाचा फायदा होणार आहे.
महत्वाचे : चेक ट्रंकेशन (CTS) सिस्टमवर RBI चे निर्देश, तुमच्यावर होणार थेट परिणाम

शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकडय़ांवरील शिक्षकांना वेतन अनुदान देण्यासाठी 140 कोटीची तरतूद केली आहे. अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकडय़ांना नव्याने 20 टक्के वेतन अनुदान व 20 टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना 20 टक्के वाढीव वेतन अनुदान हे 1 नोव्हेंबर 2020 पासून मिळणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे.
Read More…
शिवसेनेचा सामनामधून सवाल; ‘NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला ?’
परमबीर सिंह ‘नाराज’; नवीन पदभार न घेताच रजेवर
LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांना मोठी भेट ! सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, ‘पॉलिसी होल्डर्स’ला असा मिळणार फायदा, जाणून घ्या
‘माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला DGP, मुंबई CP का केलं?; IPS पांडे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘सवाल’
दिलासादायक ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे होणार खिशावरचा भार कमी अन् पैशांचीही बचत
घर बसल्या 10 हजार लावून सुरु करा ‘हा’ बिझनेस; दर महिन्याला होईल 30 हजारांची कमाई