‘चाकण फाऊंड्री डिव्हिजन’ आणि ‘कोरस एम्प्लॉईज यूनियन’मध्ये वेतनवाढीचा करार शांततेच्या मार्गाने संपन्न

चाकण ( पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळवार, दि. ३० जुलै, २०१९ रोजी चाकण एमआयडीसी औद्योगिक वसाहत, महाळुंगे (खराबवाडी) येथील कोरस (इंडिया) लिमिटेड, चाकण फाऊंड्री डिव्हिजन, चाकण (पुणे) आणि कोरस एम्प्लॉईज यूनियन यांच्यामध्ये ११,५०१ रुपये प्रत्यक्ष वेतनवाढीचा करार शांततेच्या मार्गाने संपन्न झाला. कोरस एम्प्लॉईज यूनियनचे कायदेशीर सल्लागार श्री. नितीन कुलकर्णी साहेब तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बागडी, उपाध्यक्ष श्री. रामचंद्र पवार, सरचिटणीस श्री. दिपकराज चौधरी, खजिनदार शामराव कर्णे, सहचिटणीस श्री. इब्राहिम शाह, श्री. प्रभाकर जैद आणि श्री. निंगाप्पा झेंडे यांच्या विशेष प्रयत्नाने हा वेतनवाढीचा करार झाला.

या करारामध्ये झालेले काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे :

१. हा करार ०१ ऑगस्ट २०१८ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीकरिता करण्यात आला आहे.

२. प्रत्यक्ष पगार वाढ – ११५०१/- (पहिल्या वर्षी – ७००१/-, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी प्रत्येकी १५००/-) देण्यात येईल.

३. मेडिक्लेम पॉलिसीसाठी ३ लाख (२ + १ लाख) प्रत्येक वर्षी आणि अधिकचा फंडही १ लाखापर्यंत मिळणार आहे.

४. मरनोत्तर सहायय योजना – कामगाराचा मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा मिळून एक दिवसाचा पगार आणि तेवढीच रक्कम व्यवस्थापनाकडून त्यात टाकून त्या कुटुंबाला देण्यात येईल.

५. सर्व कामगारांना ऑगस्ट २०१८ पासूनचा एकूण फरक (एरिअर्स) देण्यात येणार आहे.

६. जिपीए (GPA) पॉलिसी वतीने ६ लाख (५ + १ लाख) प्रमाणे मिळेल.

७. वार्षिक पगारवाढ – प्रति दिवस प्रत्येकी कामगार ५० पैसे करण्यात आलेली आहे.

८. हिट अलाउन्स व नाईट शिफ्ट अलाउन्स चालू करण्यात आला आहे.

९. तसेच प्रोडक्शन इन्सेन्टिव्ह प्रति महिना १४०० ते ३३५० रुपये मिळणार आहे.

१०. मेडिक्लेम पॉलिसी ही रिटायर्ड (निवृत्ती) नंतरही चालू ठेवण्यात येणार आहे.

११. मेरिट इनक्रिमेंट मध्येही वाढ करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे याव्यतिरिक्त चालू असलेल्या सुविधा तश्याच चालू ठेवण्यात आलेल्या आहे.

यावेळी कोरस (इंडिया) लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. राजकुमार साबू साहेब, सी ओ ओ श्री संजय सराफ साहेब, सी बी ओ श्री. विजय पुरोहित साहेब, व्हाईस प्रेसिडेंट श्री. अनिल कुलकर्णी साहेब तसेच कमर्शील विभागप्रमुख श्री. मनीष केडीया साहेब सहित एच आर विभाग हेड श्री. योगेश तापकिरे साहेब, श्री. अवधूत देसाई साहेब अनेक प्रतिनिधी उपस्थित होते, या करारासाठी श्री. अरविंद श्रुती साहेब आणि इतर युनियनच्या पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आरोग्यविषयक वृत्त –