Good News ! यंदा 10 टक्क्यांपर्यंत होईल Salary Increment, नवीन नोकरीची देखील संधी; जाणून घ्या तुम्हाला मिळणार का फायदा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसमुळे देशभरातील बहुतांश व्यवहारांना फटका बसला आहे. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. पण अशा सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाणार आहे. तसेच पगारही भरघोस दिला जाणार आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ (CMEI) च्या रिपोर्टनुसार, 11 एप्रिल, 2021 ला संपलेल्या सप्ताहादरम्यान बेरोजगारी दर वाढून 8.6 टक्के झाला आहे. हा दर दोन आठवड्यांपूर्वी 6.7 टक्के होता. मात्र, आता तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण यावर्षी 10 टक्क्यांनी पगार वाढणार आहे. स्टाफिंग कंपनी जिनीयस कन्सल्टन्सीच्या एका सर्व्हेमध्ये नोकरदारवर्गाला दिलासादायक बातमी मिळत आहे. या सर्व्हेमध्ये सांगितले, की कोरोना संकट असतानाही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे. 5 ते 10 टक्क्यांची वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते. याशिवाय नोकरदारांचा सॅलरी स्ट्रक्चरही बदलू शकते.

Genius Consultants च्या या सर्व्हेमध्ये देशातील 1200 कंपन्यांनी भाग घेतला होता. हा सर्व्हे फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान घेण्यात आला होता. यामध्ये निम्म्याहून अधिक कंपन्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासंदर्भात सकारात्मक आहेत. 59 टक्के कंपन्यांनी सांगितले, की त्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू इच्छितात. तर 21 टक्के कंपन्यांनी यावर्षी 2021 मध्ये पगार वाढ करण्यास नकार दिला आहे.

नवीन नोकरीची संधी

सध्या 43 टक्के कंपन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे सांगितले. म्हणजेच आता फेशर्ससाठी यावर्षी नोकरीची दारे उघडणार आहेत. तर 41 टक्के कंपन्यांनी सांगितले, की त्या रिप्लेसमेंट हायरिंग करणार आहे. म्हणजे अनुभवी लोकांनाही नोकरी मिळू शकेल. याशिवाय 11 टक्के कंपन्यांनी नवी नोकरभरती केली जाणार नसल्याचे सांगितले.