Salary Overdraft | नोकरदारांना खुशखबर ! तातडीची गरज भागवण्यासाठी खासगी आणि सरकारी बँका देत आहेत ‘ही’ सूविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे (Corona) अनेकाना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना (financial crisis) करावा लागला. दरम्यान अनेकदा आपल्याला पैशाची खूप गरज (Need a lot of money) भासते, अशा परिस्थितीत पर्सनल लोन (Personal Loan)  घेण्याचा पर्याय आपल्या समोर असतो. मात्र त्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवसांचा वेळ लागतो. अशावेळी तुम्ही पगारदार (Salaried) असाल अन् तुम्हाला तत्काळ पैशांची गरज (Urgent need for money) असेल तर  बँक आपल्याला सॅलरी ओव्हरड्रॉफ्टची सुविधा (Bank Salary Overdraft Facility) देते. याचा उपयोग करुन तुम्ही काही मिनिटांत पैसे मिळवू शकता. नोकरदार वर्गासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सरकारी आणि खासगी दोन्ही बँकेत सुविधा

सॅलरी ओव्हरड्राफ्ट (Salary Overdarft ) एक प्रकारचे बँक कर्जच (Bank loan) आहे.
यात तुम्ही संकटाच्या काळात बँक खात्यात असलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम काढू शकता.
ही सुविधा सरकारी अन् खासगी दोन्ही बँकात (Government and private banks) उपलब्ध आहे.
त्याद्वारे काही मिनिटांमध्ये पैसे खात्यात जमा होतात.
त्यासाठी प्रत्येक बँकांचे नियम वेगवेगळे असू शकतात.
कर्ज द्यावे की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

पगाराच्या 2 ते 3 पट रक्कम मिळू शकते

सॅलरी ओव्हरड्राफ्ट (Salary Overdarft) द्यायचा की नाही, हे बँक काही माहिती तपासून (Checking information) ठरवत असतात.
सॅलरी ओव्हरड्राफ्टसाठी निधीची मर्यादा असते.
वेतनाच्या 2 ते 3  पट रक्कम मिळू शकते.
काही बँका मात्र वेतनापेक्षा कमी रक्कम देतात.
सॅलरी ओव्हरड्राफ्ट हे इन्स्टंट लोन (Salary overdraft is an instant loan) असल्याने त्यासाठी आकारण्यात येणारा व्याजदर जास्त (High interest rates) असतो.
परतफेड मासिक हफ्त्यानुसार नसते. मात्र, परतफेडीस जास्त मुदत घेतल्यास व्याज जास्त भरावे लागते.

Web Title : Salary Overdraft | Good news to employees! Private and government banks are offering Salary Overdraft facility to meet the urgent need

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Milkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोविडमुळे निधन

Corona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block, ‘या’ देशातील सरकारने घेतला अजब निर्णय