नांदेड केंद्रातून देशभक्ती रूजवणाऱ्या 8500 तिरंगा ध्वजांची विक्री

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड येथे राष्ट्रध्वज बनवले जातात. या वर्षी स्वातंत्र्य दिनासाठी बनवलेल्या विविध आकारातील ८ हजार ६६८ तिरंगा ध्वजांची विक्री यंदा झाली आहे. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, नांदेडने दक्षिण भारतातच नव्हे तर देशात आपल्या खादी उत्पादनाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

अशा प्रकारे होतो तिरंगा तयार –
नांदेड येथे सुतापूर्वीचा ‘पेळू ‘मागवला जातो. हा पेळू उदगीर येथील केंद्रात पाठवला जातो. उदगीर येथे सूत कताई करून कपडा तयार केला जातो. येथील मजूर गेली अनेक वर्षांपासून मोठ्या निष्ठेने हे काम करतात. महिलांचे यात मोठे योगदान आहे. उदगीर केंद्रात सूतापासून तयार केलेला कापड नांदेड येथे येते. कापड धुलाई व रंगाईसाठी अहमदाबादला पाठवला जाते. तेथून परत ते नांदेडला येते. कापड गुणवत्ता तपासणी नांदेड प्रयोगशाळेत होते. योग्य कापड हा ध्वज आकाराप्रमाणे कटींग करून विविध पट्या तयार केल्या जातात. एक बाय दीड फुट ते चौदा बाय एकवीस फूटापर्यंतचे अशा आठ आकारातील ध्वज तयार केले जातात. अशोकचक्र हे ध्वज आकारावरून तयार केले जाते.शिलाई साठी सहा जणावर भार आहे.

या वर्षी २५ हजार ३८० राष्ट्रध्वज तयार केले असल्याचे सांगण्यात आले आहे. २ बाय ३ फूट आकाराच्या ध्वजाला मोठी मागणी देशभर आहे. हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरांचल आदी राज्यात नांदेडचा तिरंगा ध्वज पाठविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ११ ऑगस्टपर्यंत ८ हजार ६६८ ध्वजाची विक्री झाली आहे.

महात्मा गांधींपासून ते पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत अनेक दिग्गजांनी सचिव म्हणून या आयोगाची धुरा सांभाळली आहे. हा व्यवसाय कर्ज घेऊन चालवला जातो. शासनाने विणकरांना थेट अनुदान द्यावे. त्यामुळे संस्थेला, श्रमिकांना बळकटी मिळेल.अशी मागणी संस्थेकडून वारंवार होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like