चीनी वस्तूंच्या बायकॉटच्या दरम्यान दिवाळीला झाली 72 हजार कोटींची विक्री

नवी दिल्ली : कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने म्हटले की, व्यापार्‍यांनी देशातील प्रमुख बाजारात या दिवाळीला सुमारे 72,000 कोटी रूपयांची विक्री केली. व्यापार्‍यांच्या संस्थेनुसार, या वर्षी दिवाळी दरम्यान चीनी वस्तूंच्या बहिष्कारासाठी सीएआयटीच्या आव्हानानंतर कोणतीही चीनी वस्तू विकली गेली नाही. सीएआयटीने एका वक्तव्यात म्हटले, 20 वेगवेगळ्या शहरांतून मिळवलेल्या रिपोर्टनुसार, ज्यांना भारतातील प्रमुख वितरण केंद्र मानले जाते, अपेक्षा आहे की, दिवाळी सणाच्या विक्रीने जवळपास 72,000 कोटी रूपयांचा व्यापार केला आणि चीनला 40,000 कोटी रूपयांचे नुकसान झाले.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरु, हैद्राबाद, कोलकाता, नागपुर, रायपुर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनऊ, कानपुर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सूरत, कोचीन, जयपुर, चंडीगढसह 20 शहरांना वितरण शहरे मानली जातात.

सीएआयटीने म्हटले की, दिवाळी सणाच्या दरम्यान बाजारांमध्ये झालेली मजबूत विक्री भविष्यात व्यापाराची चांगली शक्यता दर्शवते. व्यापार्‍यांच्या चेहर्‍यावरील हास्य परत आणू शकते.

एफएमसीजी सामान, ग्राहक टिकाऊ वस्तु, खेळणी, वीजेची उपकरणे आणि वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाकासाठीचे सामान, भेटीच्या वस्तू, गोठ पदार्थ, मिठाई, घराची सजावट, टेपेस्ट्री, भांडी, सोने आणि दागिने, पादत्राणे, घडाळे, फर्नीचर, यांचा दिवाळीला सर्वात जास्त विकल्या गेलेल्या सामानात समावेश आहे. कपडे, फॅशन अपेरल्स, होम डेकोरेशनच्या सामानाची सुद्धा खरेदी झाली.