सलील कुलकर्णींवर बोलू काही……

मुंबई : : पोलीसनामा ऑनलाईन 
आयुष्यावर बोलू काही, दमलेल्या बाबाची कहाणी याद्वारे मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे डॉ.सलील कुलकर्णी यांचा आज जन्मदिवस. संगीतकार, गायक आणि  दिग्दर्शक असलेल्या  सलील कुलकर्णी  यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९७२ दादर,  मुंबई येथे झाला .
सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात  वयाच्या तिसऱ्या वर्षी आकाशवाणी वरून केली. लहानपणापासून संगीताकडे त्यांचा कल असला तरी तो छंद जपत त्यांनी भारती विद्यापीठाच्या वैद्यक महाविद्यालयाची पदवी प्राप्त केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर काही वर्षे वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव घेतल्यावर आपला कल संगीताकडेच आहे, हे उमगून वैद्यकीय पेशा बाजूला ठेवून पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडून संगीताचे मार्गदर्शन घेतले.
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a61bba74-c958-11e8-9229-09b3f6db4614′]
गाजलेले कार्यक्रम –
गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे.
२००३ मध्ये संदीप खरे यांच्या बरोबर त्यांनी आयुष्यावर बोलू काही हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. कवी संदीप खरे यांच्या कवितांना सलील यांनी दिलेल्या चाली युवा वर्गात विलक्षण गाजल्या. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.झी मराठी ने “नक्षत्रांचे देणे” हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले. दूरचित्रवाणी वरील सा रे ग म प तसेच गौरव महाराष्ट्राचा मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली २००३ मध्ये सलील यांचे संगीत असलेला ‘विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘पांढर’, ‘आनंदीआनंद’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘चिंटू’ आदी सुमारे २५ चित्रपटांना सलील यांनी संगीत दिले आहे . संगीतकार म्हणून काम करताना पार्श्‍वगायक म्हणूनही त्यांनी मोजकेच काम करून ठसा उमटवला आहे. छोट्या पडद्यावर ते मधली सुट्टी’ हा कार्यक्रम सादर करतात. सलील हे ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह ‘मैत्र जिवांचे’ हा कार्यक्रमही सादर करतात.
त्यांनी लोकसत्ता तसेच सकाळ या वृत्तपत्रामध्ये ते स्तंभ लेखनही केले असून ‘लपवलेल्या काचा’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.पुण्यात सलील कुलकर्णी म्युझिक स्कूल ही सुरू केले असून याद्वारे ते युवा कलाकारांना मार्गदर्शन करतात.
[amazon_link asins=’B07DJHV6S7,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d1dccbf-c958-11e8-be63-4bd85a2be43e’]