नीरव मोदीच्या रोल्स रॉयसची विक्री ‘एवढ्या’ कोटींचा मिळाला भाव

मुंबई :वृत्तसंस्था – नीरव मोदी याच्या ६ गाड्यांचा मंगळवारी ईडीने फेरलिलाव करण्यात आला. या फेरलिलावात मोदीची रोल्स रॉयस ही कार १.७० कोटींना तर पोर्शे कार ६० लाख रुपयांना विकण्यात आली.

अंमलबजावणी संचलनालयाकडून नीरव मोदीच्या ६ महागड्या गाड्यांचा लिलाव करण्यात येत आहे. याअगोदरच्या लिलावात रोल्स रॉयस घोस्टवर १.३३ कोटी रुपयांची तर पोर्शे कारवर ५४.६० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु बोली लावणाऱ्यांनी डिपॉझिटची रक्कम भरली नाही. यासोबतच इतर तीन कार्सवरही बोली लावण्यात आली होती. या गाड्य़ांचा लिलाव करण्याचे कंत्राट एमएसटीसीला देण्यात आले आहे. त्यानुसार बोलीचा अभ्यास करून कारची विक्री करायची की नाही याचा निर्णय कंपनी घेईल.