एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेल्यानं नि:शब्द झालोय, डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर सलील कुलकर्णी यांनी शेअर केली भावूक पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कर्मयोगी डॉ. बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या आणि आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी (वय 39) यांनी सोमवारी (दि.30) आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी नैराश्येतून विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. डॉ. शीतल यांच्या पार्थिवावर आनंदवनात डॉ. बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाजवळ सोमवारी संध्याकाळी दफनविधी करण्यात आला. डॉ. शीतल यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

संगीतकार, गीतकार, लेखक आणि गायक सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सलील कुलकर्णी यांंनी फेसबुकवर लिहिले आहे की, ‘ताण..मनावर..कोणाचा? परिस्थितीचा? माध्यमांचा? चर्चेचा? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली. नि:शब्द झालोय.. शीतल आमटे.. का गं?, अशा शब्दामध्ये सलील यांनी आपल्या मनातील दु:खांना वाट करून दिली आहे.

You might also like