Salim Durani Passed Away | भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन (Salim Durani Passed Away) झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम दुर्राणी (Salim Durani Passed Away) हे मागच्या काही काळापासून कर्करोगाने (Cancer) त्रस्त होते. त्यांनी क्रिकेटमध्ये 70-80 च्या दशकात आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटीत पदार्पण केलं होते. तडाखेबंद फलंदाज म्हणून त्यांची संघात ओळख होती.

सलीम दुर्राणी (Salim Durrani) हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते ज्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यत आलं होतं. त्यांना क्रिकेटमधील योगदानासाठी 1960 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भारताकडून 29 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 1202 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतक यांचा समावेश आहे तसेच त्यांनी 75 विकेटही घेतल्या आहेत. (Salim Durani Passed Away)

 

सलीम दुर्राणी यांनी शेवटचा कसोटी सामना 1973 मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) खेळला होता. यानंतर त्यांनी याच वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
यानंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळवला. त्यांनी चरित्र या हिंदी चित्रपटात परवीन बॉबीसोबत (Parveen Bobby) काम केलं होतं.
सलीम दुर्राणी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये 11 डिसेंबर 1934 रोजी झाला होता.
दुर्राणी हे फक्त 8 महिन्यांचे असताना त्यांचे कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले होते.
यानंतर भारताची फाळणी झाली तेव्हा सलीम दुर्राणी यांचे कुटुंबीय भारतात आले आणि हिकडे स्थायिक झाले.

 

Web Title :-  Salim Durani Passed Away | former cricketer salim durani passed away at age 88


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune PMC News | देवाची उरूळी, फुरसुंगी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी ३०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल; माजी मंत्री विजय शिवतारे यांचा दावा

Maharashtra Govt News | विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

IPL 2023 | गुजरातला मोठा धक्का! केन विल्यमसन आयपीएलमधून बाहेर; उपचारासाठी न्यूझीलंडला रवाना