अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलीम खाननं दिली ‘अशी’ प्रतिक्रया !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अनेकांनी वंशवाद आणि, गटबाजीचा मुद्दा उचलून धरला आहे. अलीकडेच दबंग सिनेमाचे डायरेक्टर अभिनव कश्यप यांनी पोस्ट शेअर करत समलान, सोहेल आणि अरबाज खान, पिता सलीम खान यांच्यावर करिअर बरबाद केल्याचा आरोप करत त्यांना दोषी ठरवलं होतं. नुकतीच यावर अरबाज खाननं प्रतिक्रिया दिली होती. आता मात्र सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आधी त्याचे सिनेमे बघा मग बोलू
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सलीम खान म्हणाले, “हो आम्हीच सगळं खराब केलं आहे. तुम्ही जाऊन आधी त्याचे सिनेमे बघा मग आपण बोलू. त्यानं माझंही नाव त्याच्या स्टेटमेंटमध्ये टाकलं आहे ना. त्याला कदाचित माझ्या वडिलांचं नाव माहिती नसेल. त्यांचं नाव आहे राशिद खान. त्यानं आमच्या आजोबा आणि पंजोबांचीही नावं टाकायला हवी होती. त्याला जे बोलायचं ते बोलू द्या. यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळा वाया घालवू शकत नाही.”

काय म्हणाले होते अभिनव कश्यप ?

दबंगच्या 10 वर्षांनंतर माझी कहाणी
आपले खासगी अनुभव सांगताना अभिनव म्हणाले, “माझा अनुभव काही यापेक्षा वेगळा नाहीये. मी देखील शोषण आणि धमकी अशा गोष्टींना सामोरा गेलो आहे. दबंग आला तेव्हा आणि त्यानंतरही सतत अरबाज खानकडून असे अनुभव घेतले आहेत. दबंगच्या 10 वर्षानंतर माझी कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी दबंग बनवण्यापूर्वी मला बाहेर करण्यात आलं. सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबाची मिलीभगत होती. ज्यामुळं अरबाजन खाननं मला धमकी देत माझ्या करिअरसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. अरबाज खाननं श्री अष्टविनायक फिल्मसोबत माझ्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्येही हस्तक्षेप केला होता. राज मेहता यांना पर्सनली फोन करून धमकी दिली की, माझ्यासोबत सिनेमा केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील.”

बेशर्म सिनेमाला टार्गेट केलं
अभिनव पुढे म्हणाले, “मिस्टर सलमान खान आणि कुटुंबानं मिळून माझ्या सिनेमाला नुकसान पोहोचवण्याचा खूप प्रत्न केला. रिलीजच्या आधीच बेशर्म सिनेमाविरोधात पीआरओला निगेटीव्ह अभियान चालवायला सांगितलं होतं.”

अभिनव लिहितात, “पुढील काही वर्षात माझे सर्व प्रोजेक्ट आणि प्रयत्न अयशस्वी करण्याचे प्रयत्न केले गेले. मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. घरातील महिलांना बलात्काराची धमकी दिली गेली. माझं कुटुंब बरबाद केलं. घटस्फोटासोबत 2017 मध्ये माझं कुटुंब तुटलं.”