काय सांगता ! होय, X गर्लफ्रेन्डच्या गाण्यावर डान्स करताना रडला ‘भाईजान’ सलमान (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुपरस्टार सलमान खानला आजपर्यंत आपण बिगबॉसमधील स्पधर्कांची शाळा घेताना पहिले आहे किंवा रडवताना पहिले आहे. परंतु चक्क आज सलमान खान सुद्धा एक्स गर्लफ्रेंडच्या गाण्यावर नाचताना स्वत: चे रडणे थांबवू शकला नाही.

तर शिल्पा शेट्टी विकेंड का वार मध्ये आली असताना तिने घरातील स्पर्धकांना टास्क दिले होते. यावेळी शिल्पा शेट्टीने सलमानला त्याच्याच चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करायला सांगितला, सलमान ने ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. या सिनेमात ऐश्वर्या राय त्याची हिरोईन होती आणि आपल्याला तर माहितीच आहे कि सलमान – ऐश्वर्या अनेक वर्ष रिलेशनशिप मध्ये होते.

सलमाननने खुद्द ‘तड़प-तड़पके इस दिल से आह निकलती रही’ या गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली. जसे गाणे संपताच शिल्पाने त्याला लग्न केल्यावर कसे दु:ख होते हे पाहण्यासाठी एकदा लग्न करून बघ असे सांगितल्यामुळे, सलमान स्टेजवरच रडू लागला. चॅनेलने त्यांच्या संभाषणाचा एक प्रोमो सोशल मीडियावरती प्रदर्शित केलेला आहे.