अ‍ॅक्टर नसता तर ‘या’ क्षेत्रात असता सलमान खान : कॅटरिना कैफ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ‘भारत’ चित्रपटातील सलमानची सह- कलाकार कॅटरिना कैफने सांगितले की तो एक चांगला सल्लागार बनू शकतो. जुमचे ‘बाय इन्वाइट ओनली’ च्या एका एपिसोडमध्ये कॅटरिनाने सलमान बद्दल एक वक्तव्य केले. कॅटरिना म्हणाली, “सलमान खूप मज्जाकी आहे, तो एक असा व्यक्ती आहे जो सगळ्यांना नेहमी सूट देतो. कारण आपण त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतो.

कॅटरिनाने पुढे सांगितलं की, ”तसा तर मला ह्या गोष्टींची सवय झाली आहे कारण मी त्याचसोबत ‘टाइगर जिंदा है’ सारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे आणि आता ‘भारत’ चित्रपटामध्ये सोबत काम केले आहे.

असे काही कलाकार आहेत जे आपल्याला सराव दरम्यान अनेक सूचना देतात परंतु सलमान तसा नाही.
तो आपण जशे आहोत तसचं राहण्याची सूट देतो त्यामुळे आपल्यातली कौशल्ये मुक्तपणे बाहेर यायला हवे. कॅटरिनाला विचारले गेले की जर तो ऍक्टर नसता तर त्याच्यासाठी पर्यायी करियर कोणते असले असते? त्यावर कॅटरिना म्हणाली, ”सल्लागार, पीपल एडवाइजर.