Salman Khan | सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती 4 लाखांची रायफल – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Salman Khan | गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या हत्येप्रकरणात सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Gangster Lawrence Bishnoi) पोलिसांच्या चौकशीत खळबजनक माहिती दिली आहे. लॉरेन्सने 2018 मध्ये लाँग रेंजची 4 लाख रूपयांची रायफल खरेदी करून बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या हत्येची तयारी पूर्ण केली होती. लॉरेन्सने सलमानची हत्या करण्याचा कट का रचला याचे कारण सुद्धा चौकशीत सांगितले आहे.

 

हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नोई समाजाला काळवीट प्रिय आहे. तर सलमान खानने 1998 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये ’हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीटाची शिकार केली होती. यामुळे लॉरेन्सचा सलमानवर राग होता.

 

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमानला एप्रिल 2018 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सलमानने वरच्या न्यायालयात आव्हान दिले आहे. सलमानला काही काळ जोधपूर तुरुंगातही राहावे लागले होते. नंतर त्याला भरतपूर कारागृहात हलवण्यात आले. (Salman Khan)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीत लॉरेन्स बिश्नोईने कबुल केले की, त्याने राजगढ येथे राहणार्‍या फरार असलेल्या संपत नेहराला सलमान खानला मारण्यासाठी मेसेज पाठवले होते.
लॉरेन्सने सलमानला मारण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवले होते.
त्याने सलमानच्या घराभोवती रेकीही केली. पण नेहराकडे एकच पिस्तूल होते.
त्याच्याकडे दूरच्या लक्ष्याचा वेध घेणारी रायफल नव्हती. यामुळे त्याला सलमानवर हल्ला करता आला नाही.

 

लॉरेन्सने पोलिसांना सांगितले की, त्याने 4 लाख रूपयांची आरके स्प्रिंग रायफल खरेदी करण्यासाठी दिनेश डागर नावाच्या व्यक्तीला सांगितले.
चार लाख रुपये डागरचा भागीदार अनिल पांडे यास देण्यात आले.
मात्र, 2018 मध्ये डागरच्या ताब्यातून ही रायफल पोलिसांनी जप्त केली होती.

 

 

Web Title :- Salman Khan | 4 lakh rifle bought to kill salman khan gangster lawrence bishnoi also revealed to police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा