काय सांगता ! होय, चक्क ‘शिल्पा-कतरिना’चा डान्स पाहताना ‘भाईजान’ सलमानला लागली झोप, पुढं झालं ‘असं’ काही (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. अशात त्याचे काही थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये शिल्पा आणि कतरिनाचा डान्स पाहता पाहता सलमान झोपलेला दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/CAFSf6QB44U/?utm_source=ig_web_copy_link

व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका डान्स रिअलिटी शोमधील आहे. मागच्या वर्षी शिल्पा शेट्टी जज म्हणून काम पाहत होती. या व्हिडिओमध्ये करिना कैफ आणि शिल्पा शेट्टी सलमान खानच्या ’भारत’ सिनेमातील गाणे ’एथे आ..’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या दोघींना डान्स करताना पाहून सलमान झोपण्याचे नाटक करतो आणि मग डान्स संपल्यावर त्याला जज गीता त्याला उठवते. सलमान उठतो आणि त्यांच्या डान्सवर बकवास अशी कमेंट करतो. ज्यावर सर्वजण हसू लागतात.

हा व्हिडीओ सलमान खानच्या ’भारत’ सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळचा आहे. जेव्हा सलमान त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी इंडियाज सुपर डान्सरच्या मंचावर पोहोचला होता. त्यावेळी शिल्पा आणि कतरिनानेया सिनेमातील गाण्यावर धम्माल डान्स केला होता. हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रत्यक्षात या दोघीही सलमानच्या खूप जवळच्या मैत्रीणी आहेत.