जेव्हा मेकअप आर्टीस्टच्या मुलाच्या लग्नात अचानक ‘एन्ट्री’ मारतो ‘भाईजान’ सलमान ! (व्हिडीओ)

0
26
Salman Khan

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हिंदी सिनेमातील असली नायक म्हणवला जातो. कारण सिनेमात तर तो हिरो आहेच परंतु रिअल लाईफमध्येहीतो हिरो आहे याची अनेकदा झलक पाहायला मिळत असते. गरिब आणि गरजूंसाठी सलमान कायमच दयावान होताना दिसला आहे.

नुकताच सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच तो आपला मेकअप आर्टीस्ट राजूच्या मुलाच्या लग्नात पोहोचला होता. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. सलमाननं राजूच्या मुलाच्या लग्नात अचानकच एन्ट्री मारली. त्याला अचानक लग्नात पाहून सर्वच अवाक् झाले. सलमाननं वधू-वरासोबत फोटोही काढले. यावेळी सलमान खूप आनंदी दिसला.

https://www.instagram.com/p/B6A8O80JZiK/

मेकअप आर्टीस्ट राजू गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान सोबत काम करत आहे. सलमान आपल्या आर्टीस्ट प्रति कायमच दयावान राहिला आहे. सलमाननं यावेळी ब्लॅक शर्ट आणि डेनिम घातली होती.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच त्याचा दबंग 3 हा सिनेमा रिलीज होणार आहे. 20 डिसेंबर रोजी सलमानची अॅक्शन पहायला मिळणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर तसेच सोहेल खान सोबत इतरही कलाकार दिसणार आहेत. प्रभू देवानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.