सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडच्या ‘बर्थ डे’ पार्टीत दिसले सलमान आणि त्याची GF युलिया वंतूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा 9 जुलै रोजी वाढदिवस होता. संगीताने जवळच्या मित्रांसोबत आपला 54 वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या पार्टीची शान होती सलमान खान आणि त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर.

image.png

फोटोंमध्ये सलमान खान, युलिया वंतूर, मोहनीश बहल, प्रोड्युसर साजिद नाडियाडवाला आणि त्याची पत्नी वर्धा नाडियाडवाला दिसत आहेत. बर्थ डे गर्ल संगीता ब्लॅक आऊटफिटमध्ये खूपच स्टनिंग दिसत होती.

image.png

80 आणि 90 च्या दशकात सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु होती. असेही म्हटले जात होते की, सलमान आणि संगीता लग्न करू शकतात. परंतु पुढे काही होणार त्याआधीच दोघांचे नाते तुटले.

image.png

ब्रेकअपनंतरही सलमान आणि संगीत दोघेही चांगले मित्र बनून राहिले आहेत. दोघांना अनेकदा सोबत हॅंगआऊट करताना पाहिले आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीताच्या बर्थ डे पार्टीत सलमानची सध्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूरचं असणं हे एखाद्या सरप्राईजपेक्षा कमी नव्हतं. फोटोंमध्ये संगीता आणि युलिया यांच्यात चांगली बाँडिंग दिसत आहे.

image.png

याआधीही सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत संगीता आणि युलिया यांना सोबत पाहण्यात आलं आहे. सध्या सलमान खान युलिया वंतूरला डेट करत आहे अशी माहिती समोर येत आहे. दोघांनी आपले नाते अद्याप जगजाहीर केलेले नाही.

image.png

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो दबंग 3 च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यात सलमान व्यतिरीक्त सोनाक्षी सिन्हा, साऊथ सुपरस्टार सुदीप दिसणार आहेत. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. 20 डिसेंबर 2019 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय सलमान खान आलिया भट्टसोबत इंशाअल्लाह मध्येही दिसणार आहे. संजय लीला भंसाळी हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सलमान आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

Image result for संगीता बिजलानी

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like