VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खानने एका अनोख्या अंदाजात आंतरराष्ट्रीय योग दिन 2019 साजरा केला आहे. सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमान खान स्विमिंग पूल डाईव मारताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत सलमान खानने केलेल्या स्टंटचे कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

सलमान या व्हिडीओत ब्लू टीशर्ट आणि शॉर्ट पॅंटमध्ये दिसत आहे. सलमान एका हाईटवर जातो आणि स्विमिंग पूलमध्ये बॅक फ्लिप मारतो आहे. सलमानच्या डाईवने चाहत्यांना चकितच केले आहे.

https://www.instagram.com/p/By-MLGsF4nG/?utm_source=ig_embed

सलमान खानच्या बॉडीबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान त्या अॅक्टर्सच्या यादीत येतो ज्यांना फिजिकमुळे पसंत केले जाते. अनेकांना हे माहीत नसेल परंतु सलमान खानने स्वत: अनेक अभिनेत्यांना बॉडी बिल्डींग मध्ये गाईड केले आहे. रेस 3 या सिनेमाच्या रिलीजदरम्यान बॉबी देओलनेही सांगितले होते की, आपले फिजिक शेपमध्ये आणण्यासाठी सलमानने त्याला कशा प्रकारे मदत केली होती.

सध्या सलमान खान दबंग 3 या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाव्यतिरीक्त सलमान संजय लिला भन्साळी यांच्या इंशाअल्लाह या सिनेमातही दिसणार आहे. सलमानचे चाहते या सिनेमाचीही आतुरतेने वाट पहात आहेत. सलमान खानचा भारत सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट ठरला आहे.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

Loading...
You might also like