दिग्दर्शकाने ‘या’ कारणासाठी थांबवले  ‘भारत’ चित्रपटाचे शूटिंग

मुंबई:पोलीसनामा ऑनलाइन – सलमान खानचा आगामी  भारत या चित्रपटाचे शुटिंग दिग्दर्शक अली अब्बास जफर याने  थांबवले आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात असताना या चित्रपटाचे शुटिंग  थांबवण्याचे  कारणही तसेच आहे. ते कारण आहे सलमान खानचा वाढदिवस होय ,याच कारणाने चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे . येत्या २७ तारखेला भाईजानचा  बर्थडे आहे. आता भाईजानचा बर्थ डे असताना कोण काम करणार? असा खुलासा  खुद्द अलीअब्बास यांनीकेला आहे.
अली अब्बास यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत या बाबत खुलासा केला आहे . ‘दिल्ली आणि पंजाबमधील ‘भारत’चे शेड्यूल संपले असून  चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल नवीन वर्षात सुरू होईल. भाई के बर्थ वाले महीने में कौन काम करता है. पर हम एडिट में लगे हुए है अर्थात सलमानच्या बर्थडे ची जंगी पार्टी होणार आहे असे यातून दिसून येत आहे .
या चित्रपटासाठी सलमानने प्रचंड मेहनत घेतली असून या चित्रपटात सलमान सोबत कॅटरिना कैफ, तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहेत या चित्रपटात सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like